शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

तीन लाखांपर्यंत कर सवलत?

By admin | Updated: January 24, 2017 04:56 IST

पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका डोळ््यांपुढे ठेवत असतानाच, नोटाबंदीने गांजलेल्या नागरिकांच्या

नवी दिल्ली : पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुका डोळ््यांपुढे ठेवत असतानाच, नोटाबंदीने गांजलेल्या नागरिकांच्या त्रासावर फुंकर घालणे आणि अर्थव्यवस्थेस चालना देणे, या उद्देशाने केंद्रातील मोदी सरकारचा आगामी अर्थसंकल्प समाजातील विविध वर्गांसाठी ‘अच्छे दिन’ घेऊन येईल, असे संकेत आहेत. व्यक्तिगत करमुक्त उत्पन्न मर्यादा २.५० लाख रुपयांवरून ३ लाख रुपये केली जाईल, असा अंदाज एसबीआयने वर्तविला आहे.आगामी वित्तीय वर्षात वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू होणार असल्याने आणि या नव्या करव्यवस्थेत सध्याचे अनेक केंद्रीय कर सामावून घेतले जाणार असल्याने, अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत या अर्थसंकल्पात फारसे फेरबदल केले जातील, असे दिसत नाही. मात्र, प्राप्तिकरासारख्या प्रत्यक्ष कराच्या रचनेत मोठे बदल होणे अपेक्षित मानले जात आहे.या दृष्टीने स्टेट बँक आॅफ इंडिया या देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या वित्तीय संशोधन विभागाने जारी केलेला ताजा अहवाल नोकरदार व मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देणारा आहे. व्यक्तिगत करमुक्त उत्पन्न मर्यादा २.५० लाख रुपयांवरून ३ लाख रुपये केली जाईल, कलम ८० सी अन्वये वजावटीची मर्यादा दीड लाखांवरून दोन लाख रुपये केली जाईल व गृहकर्जाच्या व्याजाची करमुक्त मर्यादा दोन लाखांवरून तीन लाख रुपये केली जाईल, अशी अपेक्षा या अहवालात व्यक्त केली गेली आहे, तसेच सध्या बँकांमधील मुदत ठेवींवर करसवलत मिळण्यासाठी ती ठेव किमान पाच वर्षांसाठी ठेवण्याची जी अट आहे, ती कमी करून तीन वर्षांवर आणणे अपेक्षित आहे, असेही हा अहवाल म्हणतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)बँकेचे मुख्य वित्तीय सल्लागार सौम्य कांती घोष यांनी तयार केलेला हा अहवाल म्हणतो की, अशा प्रकारच्या सवलती दिल्याने, सरकारला सुमारे ३५,३०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागेल, पण काळा पैसा स्वत:हून जाहीर करण्याची ‘आयडीएस-२’ योजना व बाद नोटांचे रिझर्व्ह बँकेवरील कमी झालेले दायित्व, यामुळे याची भरपाई सहज होऊ शकेल. ५ राज्यांतील मतांसाठी घोषणा नाही!पाच राज्यांच्या निवडणुका होत असताना केंद्र सरकारला आगामी अर्थसंकल्पात या राज्यांसाठीच्या खास घोषणा करता येणार नाहीत. या पाच राज्यांतील कामगिरीचा ठळकपणे उल्लेखही करता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाने अर्थसंकल्प सादर करण्यास मंजूरी देताना सोमवारी स्पष्ट केले.