जिल्ह्यात वर्षांत तळीरामांनी जिरवली आठ कोटी लिटर दारू

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:33+5:302015-02-18T00:13:33+5:30

पुण्याला व्यसनाचा विळाखा

Tiliram garnered eight million liter liquor in the district during the year | जिल्ह्यात वर्षांत तळीरामांनी जिरवली आठ कोटी लिटर दारू

जिल्ह्यात वर्षांत तळीरामांनी जिरवली आठ कोटी लिटर दारू

ण्याला व्यसनाचा विळाखा
पुणे: पुण्यासारख्या सांस्कृतीक शहरात दिवसेंदिवस रेव्ह पार्टी-चिल्लर पार्ट्यांचे प्रमाणा वाढत असून, तरुण पिढी व्यसनाच्या विळाख्यात अडकत चालली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने सादर केलेल्या वार्षिक अहवालात गेल्या वर्ष भरात एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल आठ लाख लिटर दारुची विक्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही वर्षांता मुबंईपेक्षा पुण्यातील पार्ट्यांची संख्या वाढू लागली आहे. या पार्ट्यांमध्ये इव्हेट कंपन्यांना मोठा नफा मिळत असल्याने एनएच सेव्हन सारख्या आतंरराष्ट्रीय संगीत इव्हेटचे प्रमाणही वाढले आहे. पुण्यात प्रामुख्याने कोरेगावा पार्क, मगरप˜ा, विमाननगर, बाणेर, कोंढवा, लोणावळा परिसरात आय.टी क्लचरसाठी सरास दर बुधवार, शनिवार आणि रविवार खास पार्ट्यांचे आयोजन केले जाते. अनेक आय टी कंपन्या तर कर्मचा-यांसाठी लोणावळा, पानशेत, खंडाळा येथे रिसॉर्ट बुक करुन दोन दिवसांचे इव्हेटच करतात. याशिवाय पार्टीसाठी व्हॅलेटाईन डे, होळी,फे्रर्शर पाटी४, ख्रिसमस, न्यु एअरच्या नावाखाली पार्ट्यांचे आयोजन करुन मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली जाते. शहर आणि जिल्ह्यातील पार्ट्यांचे प्रमाण वाढल्याने मद्य विक्रीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये अवैद्य मद्य विक्रीचे प्रमाणाही मोठे आहे. यामुळे गेल्या वर्षभरात उत्पादन शुल्क विभागाने अवैद्य दारू तयार करणे, विनापरवाना दारू विकणे, भेसळ करून दारू विकणे यासाठी १९ कोटी ३५ लाख ९ हजार रूपयांचा दंड केला आहे.
पुणे जिल्‘ामुळे गेल्या वर्षभरात सात कोटी ९७ लाख ४६ हजार लिटर दारूची विक्री झाली. यामध्ये तीन कोटी ६७ लाख ५३ हजार लिटर बिअर, देशी दारु दोन कोटी १३ हजार लिटर, विदेशी दारू दोन कोटी १९ लाख १४ हजार लिटर तर वाईनची ७६ हजार ८१ हजार ४३ लिटर विक्री झाली आहे. गेल्या दोन वर्षामध्ये दारूवरील कर वाढला असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलामध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे या वर्षी पुणे जिल्ह्यातून एक हजार कोटी पेक्षा जास्त महसूल जमा झाल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले.


Web Title: Tiliram garnered eight million liter liquor in the district during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.