टिळक पुण्यतिथी व साठे जयंती उत्साहात

By Admin | Updated: August 2, 2016 23:18 IST2016-08-02T23:18:46+5:302016-08-02T23:18:46+5:30

येवला : शहर व तालुक्यात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Tilak Punyathithi and Sathe Jayanti excited | टिळक पुण्यतिथी व साठे जयंती उत्साहात

टिळक पुण्यतिथी व साठे जयंती उत्साहात

येवला : शहर व तालुक्यात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जनता विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात मुख्याध्यापक किशोर नागपुरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पी.बी. खैरनार होते. विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली. याप्रसंगी नानासाहेब पटाईत, आर. एल. फडके, पी. बी. खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्र मास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. एल. फडके यांनी केले.
सुरेगाव रस्ता येथील समता माध्यमिक विद्यालयात विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. वाय. मढवई होते. मुख्याध्यापक मढवई यांनी महापुरु षांच्या चरित्रावर भाषणे केले. सूत्रसंचालन मगर यांनी केले. कुसूर येथील क्र ांतिवीर महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. डी. दाणे होते. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्र माला सुरु वात करण्यात आली. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर भाषणे केली. सूत्रसंचालन एन. व्ही. उंडे यांनी केले.
येवला पंचायत समितीत अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. सभापती प्रकाश वाघ यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गटविकास अधिकारी सुनील आहिरे, सहायक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, वसंत पवार आदिंसह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Tilak Punyathithi and Sathe Jayanti excited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.