शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Tiger Video: वाघाने केली उंटाची शिकार, पर्यटकांनी मोबाईलमध्ये कैद केला शिकारीचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:14 IST

सवाई माधोपूरमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात T-99 वाघिणीने उंटाचा फडशा पाडला. ही संपूर्ण घटना पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.

सवाई माधोपूर: तुम्ही अनेकदा वाघांच्या (Tiger) शिकारीचे व्हिडिओ पाहिले असतील. पण, सवाई माधोपूर (Sawai madhopur) मधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात (Ranthambor National Park) पर्यटकांना एका थरारक दृष्याचा अनुभव आला. रणथंबोर उद्यानात एका वाघिणीने चक्क उंटाची शिकार केली. शिकार केल्यानंतर वाघिणीने उंटाला जबड्यात पकडून झुडपात नेले आणि आपल्या पिलांसोबत शिकार फस्त केली. दरम्यान, हा संपूर्ण थरार पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही शिकारीचीघटना गुरुवारी घडली. ही T-99 वाघीण रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या झोन-10 जवळ फिरत होती. इकडे तिकडे फिरत असताना तिला एक उंट दिसला. वाघिणीने अचानक त्याच्यावर हल्ला केला आणि आपल्या दात आणि नखांनी उंटाचा फडशा पाडला. यादरम्यान उंटाने पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण वाघिणीसमोर त्याचा निभाव लागला नाही. शिकारीनंतर वाघिणीने उंटाला झुडपांच्या मागे नेले आणि आपल्या शावकांसोबत शिकार फस्त केली.

डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच पिल्लासोबत पाहिले होतेवाघिणी T-99 शावकासह प्रथम 26 डिसेंबर रोजी दिसली होती. त्यावेळी वनविभागाच्या कॅमेऱ्यात एकच शावक दिसला होता. पण, आता ती 3 शावकांची आई असल्याचे समोर आले. ही टायग्रेस टी-99 टी-60 ची मुलगी आहे. विशेष म्हणजे रणथंबोरमध्ये 80 पेक्षा जास्त वाघ आणि वाघिणी आहेत. सध्या या राष्ट्रीय उद्यानात वाघाला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी येत आहे. 

टॅग्स :TigerवाघRajasthanराजस्थान