तायडेने यापूर्वीही केला होता असाच प्रकार
By Admin | Updated: March 12, 2016 00:33 IST2016-03-12T00:33:24+5:302016-03-12T00:33:24+5:30
जळगाव: जन्म-मृत्यूचे बनावट दाखले तयार केल्याच्या प्रकरणात अडचणीत आलेल्या मनपा कर्मचारी संदीप तायडे याने यापुर्वीही मनपात असाच प्रकार केला होता, त्यामुळे त्याची विभागीय चौकशी झाली होती अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. दरम्यान, तायडे व त्याचा सहकारी सोमनाथ नारायण वाणी (रा.इंद्रप्रस्थ नगर) या दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

तायडेने यापूर्वीही केला होता असाच प्रकार
ज गाव: जन्म-मृत्यूचे बनावट दाखले तयार केल्याच्या प्रकरणात अडचणीत आलेल्या मनपा कर्मचारी संदीप तायडे याने यापुर्वीही मनपात असाच प्रकार केला होता, त्यामुळे त्याची विभागीय चौकशी झाली होती अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. दरम्यान, तायडे व त्याचा सहकारी सोमनाथ नारायण वाणी (रा.इंद्रप्रस्थ नगर) या दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.तायडेकडे असलेले होलोग्राम हे प्रशासनाचे आहेत का?, असतील निवडणुकीच्या वेळी त्याला किती देण्यात आले होते, त्यापैकी कितीचा वापर झाला व त्याने किती परत केले याची माहिती तपासाधिकारी आशिष रोही यांनी तहसीलदारांकडे लेखी पत्राद्वारे विचारली आहे.