शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडून 'छपाक' तर भाजपाकडून 'तानाजी' चित्रपटाची तिकीटं फ्री.. फ्री.. फ्री... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 22:23 IST

जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनामध्ये दीपिकाने सहभाग घेतला होता

भोपाळ - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणला, भाजपा नेते आणि समर्थकांकडून ट्रोल करण्यात आलंय. दीपिकाचा छपाक आज प्रदर्शित झाला आहे. तर, दुसरीकडे अजय देवगणचा तानाजी हाही चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे दोन्ही चित्रपटांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची स्पर्धा लागली आहे. मात्र, दीपिकाने जेएनयुमध्ये घेतलेल्या भूमिकेवरुन दीपिकाच्या छपाकला काही संघटनांकडून विरोध होत आहे.  

जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलनामध्ये दीपिकाने सहभाग घेतला होता. यावरून तिचा आगामी चित्रपट छपाकवर बहिष्कार घालण्याची मोहीम ट्रोलर्सनी राबविली आहे. तर, सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. याचा परिणाम दीपिकाच्या चित्रपटावर जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे अजय देवगणच्या तानाजी चित्रपटाचे प्रमोशन केलं जात आहे. त्यामुळेच, या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनात राजकीय हस्तक्षेप होताना दिसत आहे. 

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना छपाक चित्रपट दाखविण्यासाठी संपूर्ण थेअटरच बुक केलं आहे. तर, मध्य प्रदेशमध्ये युवक काँग्रेसकडून छपाक चित्रपटाची तिकिटे मोफत वाटण्यात येत आहे. दीपिकाचं समर्थन करण्यासाठी हा प्रमोशन फंडा सुरू आहे. दुसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांकडून अजय देवगणच्या तानाजी चित्रपटाची तिकीटे मोफत वाटण्यात येत आहेत. तानाजी चित्रपटापुढे दीपिकाच छपाक फ्लॉप व्हावा, या हेतुने भाजपा समर्थकांनी तानाजी चित्रपटाची तिकीटं मोफत वाटली आहेत. मात्र, राजकीय वादात या दोन्ही चित्रपटांना मोफत पाहण्याची संधी सर्वसामान्यांना होत आहे. त्यामुळे, प्रेक्षकांचं चांगलच भागलंय. दरम्यान, भारताचे तुकडे करू पाहणाऱ्यांसोबत, तरुणींच्या गुप्तांगावर काठीनं हल्ला करणाऱ्यांसोबत दीपिका उभी होती, याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत नाही, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं. जेएनयूतील विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जेएनयू कॅम्पसमध्ये गेलेल्या दीपिकावर इराणींनी एका कार्यक्रमात भाष्य केलं. या कार्यक्रमाचा व्हिडीओ भाजपा नेते तेजिंदर पाल बग्गांनी ट्विट केला आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसTanaji MovieतानाजीChhapaak MovieछपाकBJPभाजपाAkhilesh Yadavअखिलेश यादव