शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवार ठरला अपघात वार! कर्नाटकात टँकरवर एसयुव्ही आदळून १२ ठार, महाराष्ट्रातही मोठ्या दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 11:16 IST

बुधवारी रात्रीपासून अपघातांचे सत्र सुरु झाले आहे. चार अपघातांत मृतांचा आकडा एकूण २४ वर.

बीड आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत १२ जणांचा मृत्यू झालेला असताना कर्नाटकातही एका भीषण अपघाताचे वृत्त येत आहे. एसयुव्ही एका मोठ्या टँकरवर आदळून चिक्कबळ्ळापूरमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. 

बुधवारी रात्रीपासून अपघातांचे सत्र सुरु झाले आहे. कडा- धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला ग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या अपघातात मुंबई वरून बीडकडे जात असलेल्या  सागर ट्रॅव्हल्स ताबा सुटल्याने सकाळी सहाच्या दरम्यान पलटली. यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

पुण्याच्या पाटस हद्दीतील घाट परिसरात टायर फुटून रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या सिमेंटच्या ट्रकला लक्झरी बस आदळून अपघात झाला आहे. पहाटे साडेचारच्या दरम्यान हा अपघात घडला असून यामध्ये दोन मृत्यू तर पंधरा जखमी झाले आहेत.

तर एका थांबलेल्या टँकरला एसयूव्हीने धडक दिल्याने १२ जण ठार झाले आहेत. एसयूव्ही बागेपल्ली ते चिक्कबल्लापूरला जात होती. यात चार महिलांसह १२ प्रवासी जागीच ठार झाले. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :AccidentअपघातKarnatakकर्नाटक