शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर माझ्यावर महाभियोग येण्याची शक्यता; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
2
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
3
देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळणार; २०२६ जूनपर्यंत…
4
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
5
आजचे राशीभविष्य : बुधवार ७ जानेवारी २०२६; आजचा दिवस शुभ फलदायी, विविध स्तरांवर लाभ संभवतात
6
जि.प. निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात? १२ जिल्हा परिषदांची निवडणूक पहिल्या टप्प्यात
7
मुंबईची निवडणूक ठरविणार ‘ठाकरे ब्रँड’चे भवितव्य; उद्धव यांच्यासमोर दुहेरी आव्हान अन् कसोटी
8
प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली
9
“विलासराव देशमुख यांच्या आठवणी कोणीही पुसू शकत नाही”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
10
सभेसाठी मैदान दिले जात नाही: संजय राऊतांचा दावा; ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर एकच मोठी सभा
11
मराठी टक्का वाढवण्यास ठोस आराखडा आहे का? गेली २० वर्षे ज्यांची सत्ता होती…: प्रकाश आंबेडकर
12
जनतेचे प्रश्न सोडवण्याचा दावा करणाऱ्या नेत्यांनाच प्रचारसभांसाठी मैदान मिळेना...!
13
राहुल नार्वेकरांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज नाकारल्याचा आरोप; ८ उमेदवार हायकोर्टात
14
एमसीए निवडणुकीसाठी दोन महिन्यांत ४०० सभासदांची नोंदणी झाली कशी?
15
जेम्स लेनच्या पुस्तकातील शिवरायांवरील अवमानकारक लिखाणाबाबत २२ वर्षांनी ऑक्सफर्डने मागितली माफी
16
एमआयएमला अध्यक्ष नसला तरी फरक पडत नसल्याचा दावा; जागावाटपावरून मतभेद अन् राजीनामा
17
सोनिया गांधी यांना श्वसनाचा त्रास, रुग्णालयात दाखल
18
महामार्गांवरील प्रवासादरम्यानचा ‘नो नेटवर्क’चा त्रास आता संपणार
19
कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
20
सभांऐवजी शाखा भेटींवर भर, ठाकरे बंधूंची हटके रणनीती; 'शिवतीर्था'वर ११ तारखेला उद्धव-राज गर्जना
Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh: मध्यप्रदेशात हरणांच्या शिकारीचा थरार; चकमकीत 3 पोलीस कर्मचारी शहीद, 2 आरोपींचा एनकाउंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 09:58 IST

भाचीच्या लग्नात हरणांचे मांस खाऊ घालण्याचा हट्ट भोवला, शिकारीच्या नादात आरोपी मामाचा मृत्यू

गुना: मध्य प्रदेशातील गुना येथे शनिवारी पहाटे 3 ते 4च्या सुमारास काळ्या हरणांची शिकार करण्यासाठी आलेले शिकारी आणि पोलिसांमध्ये भीषण चकमक झाल्याची घटना घडली. या घटनेत एका SI सह तीन पोलीस शहीद झाले तर दोन हल्लेखोर शिकाऱ्यांना ठार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, भाचीच्या लग्नात आलोल्या पाहुण्यांना हरणाचे मांस खाऊ घालण्यासाठी ही शिकार करण्यात आली.

ही घटना गुनाच्या आरोनची आहे. शिकारी नौशाद याच्या भाचीचे शनिवारी लग्न होते. नौशाद याने लग्नात आलेल्या पाहुण्यांना वन्य प्राण्यांचे मांस खाऊ घालायचे ठरवले. यासाठी तो आपल्या साथीदारांसह जंगलात गेला आणि पाच हरीण आणि एका मोराची शिकार केली. प्राण्यांना घेऊन दुचाकीवरून परतत असताना त्यांचा सामना पोलिसांशी झाला. यावेळी आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळ्या चालवल्या. या गोळीबारात तीन पोलिसांचा मृत्यू झाल, तर नौशाद तिथेच मारला गेला, तर त्याचा शहजाद दुसऱ्या चकमकीत ठार झाला. पोलिस तिसऱ्या साथीदाराचा शोध घेत आहेत.

शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये मिळणार या घटनेत इन्स्पेक्टर राजकुमार जाटव, कॉन्स्टेबल नीरज भार्गव आणि कॉन्स्टेबल संतराम शहीद झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पळून गेलेल्या आरोपींची ओळख पटली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

आरोपीच्या घरावर बुलडोझर या घटनेनंतर आरोपीच्या घरावर बुलडोझर चढवण्यात आला. तसेच, ग्वाल्हेरचे आयजी अनिल शर्मा यांना या प्रकरणी त्वरित कारवाई न केल्याने त्यांना हटवण्यात आले आहे. गृहराज्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी यासंदर्भात म्हटले की, राज्यात कोणत्याही गुन्हेगारावर अशाप्रकारची कठोर कारवाई केली जाईल. कोणताही गुन्हेगार असो, तो कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यूFiringगोळीबार