शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

नशेखोराच्या किलर कारचा थरार; दोन पोलिसांसह ६ जणांना चिरडले, ७ गाड्यांचा चक्काचूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 13:47 IST

या भीषण अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह सहा जण गंभीर जखमी झाले असून ७ वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये काल रात्री एका मद्यधुंद रईसजाद्याने आपल्या आलिशान कारने अक्षरशः तांडव घातले. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने वाटेत येतील त्या वाहनांना आणि नागरिकांना उडवत नेले. या भीषण अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह सहा जण गंभीर जखमी झाले असून ७ वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली असून संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

भरधाव कार बनली काळ

मिळालेल्या माहितीनुसार, ओमती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इन्कम टॅक्स चौकात ही घटना घडली. रात्री उशिरा आरोपी अनुराग सोनी हा आपल्या कारमधून सुसाट निघाला होता. नशेच्या धुंदीत असलेल्या या चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि त्याने भंवरताल गार्डनपासूनच धुमाकूळ घालायला सुरुवात केली. रसल चौकात एका पोलिसाला धडक दिल्यानंतर त्याने गाडीचा वेग आणखी वाढवला.

एकामागून एक ७ वाहनांना उडवले

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही कार इतकी वेगात होती की समोर काय येतंय याच भान चालकाला नव्हतं. इन्कम टॅक्स चौकात उभ्या असलेल्या ३ कार आणि ४ दुचाकींना या कारने जोरदार धडक दिली. एका दुचाकीला तर कारने लांबपर्यंत फरफटत नेले आणि शेवटी सिंधिया पार्कच्या भिंतीला जाऊन धडकली. या धडकेत भिंतीचाही काही भाग कोसळला आहे.

पाणी पिण्यासाठी थांबले अन् काळ आला...

अपघातातील जखमी साहिल चौकसे याने सांगितले की, "आम्ही रस्त्याच्या कडेला पाणी पिण्यासाठी थांबलो होतो, तितक्यात मागून आलेल्या भरधाव कारने आम्हाला उडवले. धडक इतकी जोरात होती की मी जागीच बेशुद्ध झालो." या अपघातात एका लहान मुलाच्या पायालाही गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सीसीटीव्हीत थरार कैद

हा संपूर्ण थरार एका उभ्या असलेल्या कारच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामध्ये आरोपीची कार कशाप्रकारे वेड्यावाकड्या वेगाने येऊन लोकांना चिरडत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी पाठवले आणि रस्ता रिकामा केला.

आरोपी अटकेत, पोलीस तपासात व्यस्त

ओमती पोलीस ठाण्याचे प्रभारी राजपाल सिंह बघेल यांनी सांगितले की, आरोपी चालक अनुराग सोनी हा स्वतःही जखमी झाला असून तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk Driver's Rampage: Six Injured, Cars Smashed in Jabalpur

Web Summary : In Jabalpur, a drunk driver ran amok, injuring six, including two police officers. Seven vehicles were damaged as the speeding car crashed into them. The driver has been arrested, and police are investigating the incident captured on CCTV.
टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश