बेळगावात मराठींचा भडका
By Admin | Updated: November 2, 2014 01:33 IST2014-11-02T01:33:37+5:302014-11-02T01:33:37+5:30
महाराष्ट्र एकीकरण समितीने शनिवारी कर्नाटक राज्य स्थापना दिनाच्या पाश्र्वभूमीवर काळा दिन पाळून बेळगावचे बेळगावी असे नामांतर केल्याच्या निषेधार्थ मूक सायकलफेरी काढली़

बेळगावात मराठींचा भडका
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने शनिवारी कर्नाटक राज्य स्थापना दिनाच्या पाश्र्वभूमीवर काळा दिन पाळून बेळगावचे बेळगावी असे नामांतर केल्याच्या निषेधार्थ मूक सायकलफेरी काढली़ यामध्ये हजारो मराठी भाषकांनी उत्स्फूर्तपणो सहभाग नोंदवत रॅली यशस्वी केली़
तर कर्नाटक सरकार कारवाई करेल, या भीतीने या सायकल फेरीत सहभागी न झालेल्या मराठी महापौर महेश नाईक आणि उपमहापौर रेणु मुतगेकर यांना मराठी भाषकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. महापौर महेश नाईक यांच्याविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. त्यांच्या घरात शिरून गोंधळ घालण्याचादेखील प्रय} केला.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हे प्रकरण निवळले. सर्वसामान्य मराठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन महापालिकेत आम्ही सीमाप्रश्नाचा ठराव निश्चितच मांडू, अशी प्रतिक्रिया एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील यांनी सायकलफेरीच्या समारोपप्रसंगी दिली. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये शनिवारी काळा दिन पाळला. या वेळी काढण्यात आलेल्या सायकलफेरीत हजारो मराठी भाषक बांधवांनी उत्स्फूर्तपणो सहभाग नोंदवला़