‘ते’ तिन्ही युवक भारतात परतले
By Admin | Updated: December 27, 2015 00:16 IST2015-12-27T00:16:27+5:302015-12-27T00:16:27+5:30
सौदी अरेबियात नियोक्त्याने केलेल्या शारीरिक छळानंतर केरळमधील तिन्ही युवक शनिवारी पहाटे आपल्या राज्यात परतले. सौदी अरेबियातील एका नियोक्त्याने या तिन्ही युवकांना

‘ते’ तिन्ही युवक भारतात परतले
थिरुवनंतपूरम : सौदी अरेबियात नियोक्त्याने केलेल्या शारीरिक छळानंतर केरळमधील तिन्ही युवक शनिवारी पहाटे आपल्या राज्यात परतले. सौदी अरेबियातील एका नियोक्त्याने या तिन्ही युवकांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उजेडात आली होती. केरळ सरकार व परराष्ट्र मंत्रालयाने या युवकांच्या मदतीसाठी हस्तक्षेप केला होता. थिरुवनंतपूरम विमानतळावर पोहोचताच या तिघांचे नातेवाईक व मित्रांनी स्वागत केले. बायजू, अविलाष आणि विमलकुमार अशी त्यांची नावे आहेत. नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली एका प्लेसमेंट एजन्सीने त्यांना दोन महिन्यांपूर्वी सौदीत नेले होते. या तिघांनाही पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.