शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

कठुआ बलात्कार व खून खटल्यात तिघांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 02:59 IST

तीन पोलिसांनाही कैद : आठ वर्षांच्या पीडितेस मरणोत्तर न्याय

पठाणकोट : संपूर्ण देशात ज्यामुळे संतापाची लाट उसळली होती त्या जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील आठ वर्षांच्या मुलीच्या बलात्कार व खून खटल्यात न्यायालयाने सोमवारी तीन मुख्य आरोपींना जन्मठेप व तीन पोलीस अधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या घटनेला आलेला राजकीय रंग व स्थानिक वकिलांचा बहिष्कार यामुळे सर्वोच्च न्यायालयाने खटला पंजाबमधील पठाणकोट येथे चालविण्याचा आदेश दिला होता.

सत्र न्यायाधीश तेजविंदर सिंग यांनी निकाल सोमवारी सकाळी जाहीर करताना सातपैकी सहा आरोपींना दोषी धरले. शिक्षेवरील युक्तिवाद ऐकल्यावर आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली. खटल्याचे कामकाज ‘इन कॅमेरा’ चालले. नंतर वकिलांनी बाहेर आल्यावर निकालाची माहिती दिली. कठुआच्या रसाना गावात माणुसकीला काळिमा फासणारा गुन्हा घडला. गावप्रमुख व माजी अधिकारी सांझीराम जनगोत्रा, पुतण्या प्रवेश कुमार व पोलीस अधिकारी दीपक खजुरिया या तिघांना कट रचणे, सामूहिक बलात्कार व खून या गुन्ह्यांसाठी जन्मठेप ठोठावण्यात आली. सांझीराम व त्याच्या बहिणीकडून अनुक्रमे तीन लाख व दीड लाख रुपयांची लाच घेऊन प्रकरण दडपून टाकू पाहणारे पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्त वर्मा, जमादार तिलक राज व पोलीस अधिकारी सुरिंदर कुमार वर्मा यांना पाच वर्षांची सक्तमजुरी सुनावण्यात आली.

सांझीरामचा मुलगा विशाल जनगोत्रा हाही आरोपी होता. परंतु ही घटना घडली तेव्हा आपण उत्तर प्रदेशमध्ये मुजफ्फरनगरला परीक्षा देत होतो, हा बचाव मान्य करून न्यायालयाने त्यास निर्दोष मुक्त केले. गेल्या वर्षी ३१ मेपासून खटल्याची रोज सुनावणी झाली. आरोपींनाही गुरदासपूर कारागृहात ठेवले होते. विशेष म्हणजे १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची तरतूद करणारा वटहुकूम काश्मीर सरकारने या घटनेनंतर काढला. धार्मिक द्वेषाचे पाशवी कृत्य पीडित मुलगी बक्करवाल या भटक्या मुस्लीम समाजातील होती. काश्मीर पोलिसांच्या तपासी पथकाच्या आरोपपत्रानुसार या समाजाचा मुक्काम कठुआ जिल्ह्यात असताना त्यांच्याकडून काही हिंदू मुलांना मारहाण झाली होती. याचा सूड उगवण्यासाठी बलात्काराचा कट रचला गेला. कुरणांत घोडे चरायला घेऊन गेलेल्या मुलीचे अपहरण केले गेले. तिला गुंगी आणणारे औषध पाजून रसाना गावातील सांझीराम यांच्या मालकीच्या देवळात आठवडाभर डांबले. या काळात तिच्यावर वारंवार बलात्कार केले आणि नंतर गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केल्यावर तिचा मृतदेह बाहेर फेकून देण्यात आला. सरकारमध्ये आले वितुष्टया घटनेला धामिक व राजकीय रंग दिला गेला. गावकऱ्यांच्या विरोधामुळे मुलीचा दफनविधी आठ किमी दूर करावा लागला. त्यानंतर तो भटका समाज जिल्हा सोडून निघून गेला. त्यावेळी काश्मीरच्या सरकारमधील चौधरी लाल सिंग व चंदर प्रकाश गंगा या भाजपच्या मंत्र्यांनी आरोपींचे समर्थन केले होते. वकिलांनाही असहकार पुकारून पोलिसांना आरोपपत्र दाखल करू दिले नाही. या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली होती.

 

टॅग्स :Kathua Rape Caseकठुआ बलात्कार प्रकरणCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी