दिल्लीत सब इन्स्पेक्टरच्या कारच्या धडकेत ३ महिला ठार
By Admin | Updated: May 12, 2015 18:43 IST2015-05-12T18:40:25+5:302015-05-12T18:43:27+5:30
दिल्लीत सब इन्स्पेक्टरच्या गाडीची धडक बसून तीन महिला मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे

दिल्लीत सब इन्स्पेक्टरच्या कारच्या धडकेत ३ महिला ठार
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - लाच दिली नाही म्हणून ट्रॅफिक पोलिसाने महिलेला वीट फेकून मारल्याची घटना ताजी असतानाच दिल्लीत सब इन्स्पेक्टरच्या गाडीची धडक बसून तीन महिला मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. मीरा, शकुंतला व माया असे त्या तीन महिलांचे नाव आहे. दिल्लीतील बदरपूर परिसरात आज दुपारी हा अपघात घडला असून त्यात इतर सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सब इन्स्पेक्टर भरधाव वेगाने गाडी चालवत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने महिलांना धडक दिली. एक महिला तर त्याच्या गाडीखाली येऊन काही अंतरापर्यंत फरफटत गेली. याप्रकरणी पोलिसांनी सब इन्स्पेक्टरला अटक केली आहे.