रुग्णवाहिकेचा अपघातात तीन महिला जखमी
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:37+5:302015-02-14T23:50:37+5:30
नगरसूल : ममदापूर-नगरसूल रस्त्यावर रुग्णवाहिकेला झालेल्या अपघातात तीन महिला जखमी, तर एका महिलेची अपघातापूर्वीच प्रसूती झाली. नगरसूल ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका (एमएच १६ एबी ८१) ही ममदापूर येथून आशा मदतनीस या महिलेच्या भ्रमणध्वनीवरून ममदापूर येथील मनीषा अशोक ठाकरे (२५) हिला प्रसूतीपूर्वीच्या वेदना होत असल्याने तिला प्रसूतीसाठी नगरसूल ग्रामीण रुग्णालयात आणत असताना कोळगाव गावाजवळ गाडीतच ही महिला प्रसूत होऊन मुलगी झाली. काही अंतरावरच राजेंद्र पगारे यांचे वस्तीजवळ वळणावर रुग्णवाहिका रस्त्यावरून खाली घसरली. त्यात सदर महिलेसोबत असलेल्या संगीता सोनवणे (३४) व मीराबाई मोरे (५८) या जखमी झाल्या. सदर जखमी महिला व प्रसूूत झालेली महिला यांना नगरसूल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)

रुग्णवाहिकेचा अपघातात तीन महिला जखमी
न रसूल : ममदापूर-नगरसूल रस्त्यावर रुग्णवाहिकेला झालेल्या अपघातात तीन महिला जखमी, तर एका महिलेची अपघातापूर्वीच प्रसूती झाली. नगरसूल ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका (एमएच १६ एबी ८१) ही ममदापूर येथून आशा मदतनीस या महिलेच्या भ्रमणध्वनीवरून ममदापूर येथील मनीषा अशोक ठाकरे (२५) हिला प्रसूतीपूर्वीच्या वेदना होत असल्याने तिला प्रसूतीसाठी नगरसूल ग्रामीण रुग्णालयात आणत असताना कोळगाव गावाजवळ गाडीतच ही महिला प्रसूत होऊन मुलगी झाली. काही अंतरावरच राजेंद्र पगारे यांचे वस्तीजवळ वळणावर रुग्णवाहिका रस्त्यावरून खाली घसरली. त्यात सदर महिलेसोबत असलेल्या संगीता सोनवणे (३४) व मीराबाई मोरे (५८) या जखमी झाल्या. सदर जखमी महिला व प्रसूूत झालेली महिला यांना नगरसूल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)