तिपटीने वाढली सोन्याची तस्करी
By Admin | Updated: October 17, 2014 02:45 IST2014-10-17T02:45:56+5:302014-10-17T02:45:56+5:30
सोन्याच्या तस्करीमध्ये यंदा आतार्पयत तिपटीने वाढ नोंदली असल्याच्या पाश्र्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

तिपटीने वाढली सोन्याची तस्करी
नवी दिल्ली : सोन्याच्या तस्करीमध्ये यंदा आतार्पयत तिपटीने वाढ नोंदली असल्याच्या पाश्र्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या मौल्यवान धातूच्या तस्करीला अटकाव घालण्यासाठी संबंधित अधिका:यांना अधिक सावध राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अधिकृत सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआरआयने यासंदर्भात देशभरातील सर्वच आंतरराष्ट्रीय वाहतूक चौक्यांवर आवश्यक ती दक्षता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. तस्करी व सीमाशुल्क चोरीस अटकाव घालण्याचे काम करणारी संचालनालय ही देशातील प्रमुख यंत्रणा म्हणून ओळखली जाते.
डीआरआय व सीमा शुल्क विभागाने यंदा एप्रिल ते ऑगस्टदरम्यान सोन्याच्या तस्करीची कमीत कमी 1,78क् प्रकरणो नोंदवली आहेत. सूत्रंनी सांगितले की, या काळात 47क् कोटी रुपयांचे तस्करी करण्यात आलेले सोने जप्त करण्यात आले आहे. दुसरीकडे एप्रिल-सप्टेंबर 2क्13 मध्ये अशा प्रकारची एकूण 55क् प्रकरणो नोंदली गेली होती व 153 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते. दरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाने जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार, सोन्याच्या तस्करीसाठी नवनवीन क्लृप्तींचा वापर केला जात आहे. यात शीतपेयांच्या बॉटलचा वापर, घरगुती वस्तू व बूट आदींसोबतच अनेक अन्य मार्गाचा अवलंब केला जात असून या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना अवलंबण्याचे निर्देश संचालनालयाने दिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4 राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्याचा भाव 19क् रुपयांनी वधारून 27,84क् रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. सणासुदीच्या काळातील वाढती मागणी व अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयातील घसरणीच्या पाश्र्वभूमीवर सोन्याच्या भावात ही वाढ नोंदली गेली.
4बाजारातील जाणकारांनी सांगितले की, सराफा व्यापारी व किरकोळ ग्राहक यांची सणासुदीच्या काळातली मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने सोन्याची खरेदी झाली. जागतिक बाजारातही तेजीचा कल होता. दरम्यान, दिवसभराच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया 61.59 या आठवडाभराच्या खालच्या पातळीला गेला. याचा सोन्याच्या भावावर परिणाम झाल्याचे दिसून आले.
4न्यूयॉर्क बाजारात सोन्याचा भाव क्.72 टक्क्यांनी वाढून पाच आठवडय़ांचा उच्चंक 1,241.1क् डॉलर प्रतिऔंसवर गेला, तर चांदीचा भावही क्.32 टक्क्यांनी वधारून 17.45 डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.
4दिल्लीतच 99.9 व 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 19क् रुपयांच्या तेजीसह अनुक्रमे 27,84क् व 27,64क् रुपये प्रतिकिलोवर आला. यात काल 7क् रुपयांची वाढ झाली होती. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 1क्क् रुपयांनी वाढून 24,3क्क् रुपये झाला.
4तयार चांदीचा भाव 1क्क् रुपयांनी वाढून 38,9क्क् रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 1क्5 रुपयांच्या तेजीसह 38,87क् रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी 69,क्क्क् रुपये व विक्रीकरिता 7क्,क्क्क् रुपयांवर कायम राहिला.