शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पंजाब सीमेवर त्रिस्तरीय सुरक्षा, १५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू; परवानगीनंतरच वाहनांना प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 12:04 IST

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: शेतकरी संघटनांच्या दिल्ली मोर्चाच्या आंदोलनासंदर्भात हरियाणा पोलिसांनी अभेद्य सुरक्षा व्यवस्था केली आहे. पंजाब सीमेवर त्रिस्तरीय पोलिस बंदोबस्त असेल. सर्वप्रथम बीएसएफचे जवान असतील आणि त्यांच्या मागे आरएएफ आणि आरएएफच्या मागे हरियाणा पोलिसांचे सशस्त्र सैनिक तैनात असतील. पंजाबची सीमा सील करण्याबरोबरच लिंक रोडवर पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले असून १३ फेब्रुवारीला तपासणी आणि परवानगी मिळाल्यानंतरच वाहनांना हरियाणात प्रवेश दिला जाईल.

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे कोणत्याही प्रकारची निदर्शने किंवा मोर्चा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यभरातील गुप्तचर विभागाचे कर्मचारी क्षणोक्षणी माहिती गोळा करून मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरविणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा हरियाणा पोलिसांनी दिला आहे. कोणत्याही प्रकारचा मजकूर किंवा व्हिडिओ पडताळणीशिवाय सोशल मीडियावर शेअर करू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

औद्योगिक संघटनांनीही प्रशासनाकडे मागितली मदत

सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, कुंडली, बडी, बहादूरगड आणि लगतच्या विविध औद्योगिक संघटनांनी प्रशासनाला विनंती केली आहे की त्यांनी आंदोलन थांबवण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत कारण शेवटच्या आंदोलनामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. ते म्हणाले की, राज्यातील विविध शेतकरी संघटनांनीही पोलीस प्रशासनाला आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. ट्रॅक्टर-ट्रॉली शेतात धावण्यासाठी असून कोणत्याही प्रकारच्या प्रदर्शनासाठी नाही, असे आवाहनही या शेतकरी संघटनांनी केले आहे.

येथून रहदारीची माहिती मिळवा

रहदारीशी संबंधित किंवा इतर महत्त्वाच्या माहितीसाठी, हरियाणा पोलिसांचे सोशल मीडिया अकाउंट @Haryana_Police, @DGPHaryana आणि फेसबुक अकाउंट हरियाणा पोलिस फॉलो करा. या सोशल मीडिया अकाउंटवर सर्व महत्त्वाची माहिती वेळोवेळी अपडेट केली जाईल. तसेच पंजाबला जाणाऱ्या प्रवाशांनी हरियाणा पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या वाहतूक सल्ल्यांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, डायल - ११२ वर संपर्क साधा.

टॅग्स :FarmerशेतकरीPunjabपंजाबHaryanaहरयाणाdelhiदिल्ली