हिजबुल मुजाहिदीनच्या तीन अतिरेक्यांना अटक
By Admin | Updated: July 16, 2017 23:32 IST2017-07-16T23:32:28+5:302017-07-16T23:32:28+5:30
हिजबुल मुजाहिदीन (एचएम) या अतिरेकी संघटनेची शाखा सुरक्षा दलांनी उघडकीस आणून उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात तीन जणांना अटक केली.

हिजबुल मुजाहिदीनच्या तीन अतिरेक्यांना अटक
श्रीनगर : हिजबुल मुजाहिदीन (एचएम) या अतिरेकी संघटनेची शाखा सुरक्षा दलांनी उघडकीस आणून उत्तर काश्मीरच्या
बारामुल्ला जिल्ह्यात तीन जणांना अटक केली.
पोलिसांनी रविवारी येथे दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत बारामुल्ला पोलिसांना इतर सुरक्षा दलांनी मदत केली. ही शाखा दहशतवादासाठी तरूण मुलांना आमिषे दाखवत होती, असे बारमुल्लाचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक इम्तियाझ हुसेन मिर म्हणाले.
मिर म्हणाले,‘‘हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर परवेझ वाणी उर्फ मुबाशीर (रा.गगलोरा हंडवारा, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्हा) ही शाखा चालवायचा.’’ बारामुल्ला जिल्ह्यातील अन्सरुल्लाह तंतारे (रा. राजपुरा पलहालन) अब्दुल रशीद भट (रा. मिनिपुरा, सोपोर) आणि मेहराजुद्दीन काक (रा.अंदरगामी पट्टण) यांना अटक करण्यात आली.