विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारे तीन शिक्षक पसार

By Admin | Updated: October 3, 2015 00:20 IST2015-10-03T00:20:39+5:302015-10-03T00:20:39+5:30

अकोला: महाविद्यालयात ११ वीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणार्‍या तीन शिक्षकांविरुद्ध गुरुवारी सायंकाळी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तीनही शिक्षक शहरातून पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Three teachers sexually assaulted | विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारे तीन शिक्षक पसार

विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणारे तीन शिक्षक पसार

ोला: महाविद्यालयात ११ वीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणार्‍या तीन शिक्षकांविरुद्ध गुरुवारी सायंकाळी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तीनही शिक्षक शहरातून पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
शहरातील गोरक्षण रोडवरील एका महाविद्यालयात इयत्ता ११ वीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थिनीला शिक्षक भरत राणे हा वाईट दृष्टीने पाहत होता. राणे नेहमीच विद्यार्थिनीला जवळ बोलावून तिच्या गालावर, अंगाला स्पर्श करायचा. गुरुवारी त्याने विद्यार्थिनीला तुला ॲक्टीव्हा स्कूटर घेऊन देतो. तू घरी ये, असे म्हटले आणि तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब विद्यार्थिनीने तिच्या आईला सांगितल्यावर तिने महाविद्यालयात येऊन शिक्षकाला जाब विचारला. त्यावेळी शाळेतील शिक्षक मिलिंद मनवर आणि बोरकर यांनी विद्यार्थिनी व तिच्या आईला तुमच्या मुलीला परीक्षेत नापास करू, अशी धमकी दिली. विद्यार्थिनीने राज्य महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांच्या मदतीने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तीनही शिक्षक शहरातून पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
000000000000000000

Web Title: Three teachers sexually assaulted