रायसोनी हॉस्पीटलमधील तोडफोडप्रकरणी तिघांना अटक
By Admin | Updated: August 9, 2016 22:00 IST2016-08-09T22:00:54+5:302016-08-09T22:00:54+5:30
जळगाव: रायसोनी हॉस्पिटलमधील कर्मचार्यांना शिवीगाळ, मारहाण व काऊंटरचा काच फोडणार्या इम्रान खान मुस्ताक खान (वय २७), इम्रान अली फिरोज अली (वय २४) व भूतपलीत उर्फ शेख अझरुद्दीन शेख हुसनोद्दीन (वय २३) तिन्ही रा.शाहू नगर, जळगाव या तिघांना शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ३ ऑगस्ट रोजी रात्री ११.१५ वाजता या तिघांनी तोडफोन करून कंपाऊडर जितेंद्र अभिमन पाटील (वय २५ रा.शिरसाळा, ता.बोदवड) व महिला कर्मचार्याला शिवीगाळ केली होती. काच फोडल्यामुळे जितेंद्रच्या हाताला जखम झाली होती. दुसर्या दिवशी तिघांवर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांच्या पथकाने तिघांना अटक केली.

रायसोनी हॉस्पीटलमधील तोडफोडप्रकरणी तिघांना अटक
ज गाव: रायसोनी हॉस्पिटलमधील कर्मचार्यांना शिवीगाळ, मारहाण व काऊंटरचा काच फोडणार्या इम्रान खान मुस्ताक खान (वय २७), इम्रान अली फिरोज अली (वय २४) व भूतपलीत उर्फ शेख अझरुद्दीन शेख हुसनोद्दीन (वय २३) तिन्ही रा.शाहू नगर, जळगाव या तिघांना शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ३ ऑगस्ट रोजी रात्री ११.१५ वाजता या तिघांनी तोडफोन करून कंपाऊडर जितेंद्र अभिमन पाटील (वय २५ रा.शिरसाळा, ता.बोदवड) व महिला कर्मचार्याला शिवीगाळ केली होती. काच फोडल्यामुळे जितेंद्रच्या हाताला जखम झाली होती. दुसर्या दिवशी तिघांवर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांच्या पथकाने तिघांना अटक केली.