उत्तरप्रदेशातून अलकायदाच्या तिस-या संशयिताला अटक

By Admin | Updated: December 17, 2015 11:56 IST2015-12-17T11:56:30+5:302015-12-17T11:56:30+5:30

उत्तरप्रदेशच्या संभलमधून अलकायदा या दहशतवादी संघटनेच्या एका संशयित अतिरेक्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Three suspected al-Qaeda suspects arrested in Uttar Pradesh | उत्तरप्रदेशातून अलकायदाच्या तिस-या संशयिताला अटक

उत्तरप्रदेशातून अलकायदाच्या तिस-या संशयिताला अटक

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १७ - उत्तरप्रदेशच्या संभलमधून अलकायदा या दहशतवादी संघटनेच्या एका संशयित अतिरेक्याला पोलिसांनी अटक केली आहे. जफर मसूद असे या संशयिताचे नाव असून,  भारतात आठवडयाभरात अलकायदाच्या तिस-या अतिरेक्याला अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी याआधी अब्दूल रहमानला ओडिशाच्या कटकमधून तर, मोहम्मद असीफला दिल्लीतून अटक केली होती. उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आलेल्या जफर मसूदला आज दिल्लीतील सत्र न्यायालयात हजर केले जाईल. 

Web Title: Three suspected al-Qaeda suspects arrested in Uttar Pradesh