दिल्लीत तीन मजली इमारत कोसळून १० ठार

By Admin | Updated: June 28, 2014 17:41 IST2014-06-28T10:17:56+5:302014-06-28T17:41:29+5:30

उत्तर दिल्लीतील इंदर लोक परिसरातील एक तीन मजली इमारत कोसळून १० जण ठार झाले.

Three-storey building collapsed in Delhi, killing 10 | दिल्लीत तीन मजली इमारत कोसळून १० ठार

दिल्लीत तीन मजली इमारत कोसळून १० ठार

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २८ - उत्तर दिल्लीतील इंद्रलोक परिसरातील ५० वर्षे जुनी असलेली इमारत कोसळून १० जण ठार झाले आहेत. शनिवारी सकाळी घटलेल्या या दुर्घटनेत ढिगा-याखाली दबून अनेक जण जखमी झाले. सकाळी नऊच्या सुमारास ही तीनमजली इमारत कोसळली. मृतांमध्ये पाच मुलांचा व तीन महिलांचा समावेश आहे. 
हे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना उपाचरांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यातील चारजणांचा गंभीर जखमी झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस, प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने ढिगारा हलविण्यात आला. दरम्यान ही इमारत नेमकी कोणत्या कारणामुळे कोसळली हे अद्याप कळू शकलेले नाही.

Web Title: Three-storey building collapsed in Delhi, killing 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.