वृद्धेसह तिघांनी घेतले विष

By Admin | Updated: June 12, 2015 01:52 IST2015-06-12T01:52:40+5:302015-06-12T01:52:40+5:30

नागपूर : वाडीतील एका वृद्धेसह तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. कुंदा धनराज ठवकर (वय ६०) यांनी गुरुवारी सकाळी ९.१५ ला विष प्राशन करून आत्महत्या केली. त्या सत्यसाई सोसायटी, दत्तवाडी येथे राहत होत्या.

Three of the poison with an aged | वृद्धेसह तिघांनी घेतले विष

वृद्धेसह तिघांनी घेतले विष

गपूर : वाडीतील एका वृद्धेसह तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. कुंदा धनराज ठवकर (वय ६०) यांनी गुरुवारी सकाळी ९.१५ ला विष प्राशन करून आत्महत्या केली. त्या सत्यसाई सोसायटी, दत्तवाडी येथे राहत होत्या.
मानेवाड्यातील महाकालीनगरात राहणारा गिरीश जागेश्वर धकाते (वय ३२) यानेही विष घेतल्याने त्याचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. तर, अंबाझरीतील पांढराबोडीत राहणारे दिलीप इसरू मडावी (वय ५९) यांनी ३ जूनला विषारी औषध प्राशन केल्याने त्यांची प्रकृती खराब झाली़ त्यांना उपचाराकरिता मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी ८ वाजता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले़ या तीनही प्रकरणात वाडी, हुडकेश्वर आणि अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
----
तरुणाने लावला गळफास
नागपूर : हिवरीनगर झोपडपट्टीत राहणारा जितेंद्र लक्ष्मण बतवा (वय ३२) याने बुधवारी दुपारी ३.४५ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली़ अर्जुन मंगलजी बतवा (वय ४५) याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
---

Web Title: Three of the poison with an aged