गुटखा प्रकरणी तीन जणांना अटक
By Admin | Updated: April 28, 2016 00:33 IST2016-04-28T00:33:06+5:302016-04-28T00:33:06+5:30
जळगाव: बंदी असतानाही सहा प्रकारचा दहा लाख रुपयांचा गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी रवीकुमार वासुदेव राजपाल गुटखा, साजन चंदुमल कुकरेजा व दीपक सुरेशमल कुकरेजा या तिघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सकाळी त्यांना अटक केली. अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी संध्याकाळी सात वाजता सिंधी कॉलनी व कंवरनगर भागात धाड टाकून रवीकुमार वासुदेव राजपाल यांच्या राहत्या घरातून विविध सहा प्रकारचा ९ लाख ५५ हजार २२० रुपये किमतीचा गुटखा पकडला. साजन चंदुमल कुकरेजा याच्या चहाच्या दुकानातूनही १३ हजार १५० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

गुटखा प्रकरणी तीन जणांना अटक
ज गाव: बंदी असतानाही सहा प्रकारचा दहा लाख रुपयांचा गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी रवीकुमार वासुदेव राजपाल गुटखा, साजन चंदुमल कुकरेजा व दीपक सुरेशमल कुकरेजा या तिघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सकाळी त्यांना अटक केली. अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी संध्याकाळी सात वाजता सिंधी कॉलनी व कंवरनगर भागात धाड टाकून रवीकुमार वासुदेव राजपाल यांच्या राहत्या घरातून विविध सहा प्रकारचा ९ लाख ५५ हजार २२० रुपये किमतीचा गुटखा पकडला. साजन चंदुमल कुकरेजा याच्या चहाच्या दुकानातूनही १३ हजार १५० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.अन्न व औषध प्रशासन विभागाने एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने कंवर नगरात धाड टाकली होती. रात्री दहा वाजता गुटख्याचे तीन मिनी टेम्पो भरुन आंबेडकर मार्केटमधील कार्यालयात आणण्यात आले होते. पहाटे सहा वाजेपर्यंत गुटख्याचा पंचनामा सुरु होता. बुधवारी सकाळी अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी फिर्याद दिल्यानंतर तिघांविरुध्द अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी आरोपींना अटक केली. सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे व सहायक उपनिरीक्षक रतन आठवले यांच्याकडे दोन वेगवेगळे गुन्हे सोपविण्यात आले आहे.