तीन पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले, दिल्ली, मुंबई, गोव्याला धोका

By Admin | Updated: April 6, 2016 21:45 IST2016-04-06T15:54:09+5:302016-04-06T21:45:04+5:30

तीन पाकिस्तानी दहशतवादी भारतात शिरले असून ते मारुती स्विफ्ट डिझायर कारमधून प्रवास करत आहेत.

Three Pakistani terrorists entered India, Delhi, Mumbai and Goa are at risk | तीन पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले, दिल्ली, मुंबई, गोव्याला धोका

तीन पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले, दिल्ली, मुंबई, गोव्याला धोका

ऑनलाइन लोकमत 

 

नवी दिल्ली, दि. ६ - तीन पाकिस्तानी दहशतवादी भारतात शिरले असून ते  मारुती स्विफ्ट डिझायर कारमधून प्रवास करत आहेत. त्यांच्याकडे स्फोटके आणि सुसाईड बेल्ट आहे. ते दिल्ली, मुंबई किंवा गोव्याला लक्ष्य करु शकतात अशी माहिती गुप्तचर खात्यातील सूत्रांनी दिली आहे. 

 

 

JK-01 AB-2654 असा या कारचा क्रमांक आहे. पंजाबमधील एक स्थानिकही या दहशतवाद्यांसोबत गाडीमध्ये आहे. संबंधित राज्यातील पोलिसांना सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महत्वाची सार्वजनिक स्थळे, लष्करी इमारती, बाजार, मॉल, रेल्वे स्थानके आणि शैक्षणिक संस्थांच्या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 
 

 

केंद्र सरकारने दिल्ली, मुंबई आणि गोव्यामध्ये सुरक्षा बंदोबस्तात वाढ करण्याची सूचना दिली आहे. काश्मिरमार्गे या सशस्त्र अतिरेक्यांनी भारतात प्रवेश केल्याची माहिती गुप्तचरांनी दिली.                                                           

 

 



Web Title: Three Pakistani terrorists entered India, Delhi, Mumbai and Goa are at risk