अश्लील संदेश पाठविणार्‍याला तीन महिने कारावास

By Admin | Updated: July 4, 2015 00:06 IST2015-07-04T00:06:00+5:302015-07-04T00:06:00+5:30

- राज्यातील पहिलेच प्रकरण

Three months imprisonment for sending obscene messages | अश्लील संदेश पाठविणार्‍याला तीन महिने कारावास

अश्लील संदेश पाठविणार्‍याला तीन महिने कारावास

-
ाज्यातील पहिलेच प्रकरण
मुंबई : सोशल मीडियावर मैत्री झाल्यावर तरुणीला ईमेलद्वारे अश्लील संदेश तसेच फोटो पाठविणार्‍या मॅकेनिकल इंजिनिअर तरुणाला न्यायालयाने ३ महिन्यांचा कारावास व दंड ठोठावला. अशा प्रकारे महिलांना मनस्ताप दिल्याबद्दल (सायबर स्टॉकिंग) एखाद्याला शिक्षा झालेले राज्यातील हे पहिलेच प्रकरण आहे.
योगेश प्रभू असे या तरुणाचे नाव असून तो नवी मुंबईचा रहिवासी आहे. २००९मध्ये त्याची ३३ वर्षीय तरुणीशी सोशल मीडियावर ओळख झाली. सुरुवातीच्या संवादानंतर दोघांच्या गाठीभेटी झाल्या. जसजशी ओळख वाढत गेली तसतसा योगेशचा स्वभाव तिला खटकू लागला. त्यामुळे तिने त्याच्याशी सोशल मीडिवरून संवाद साधण्याचे बंद केले.
काही दिवसांनंतर तरुणीच्या ईमेल आयडीवर अनोळखी आयडीवरून अश्लील मजकुराचे ईमेल येऊ लागले. यासदंर्भात तिने गुन्हे शाखेचे तत्कालीन सहआयुक्त राकेश मारिया यांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला. त्यानुसार सायबर सेलने अश्लील मजकूर व फोटो पाठविणार्‍याचा आयपी ॲड्रेस शोधला. हा आयपी ॲड्रेस असलेल्या कंपनीत पोलीस पथकाने चौकशी केली तेव्हा योगेश प्रभूचे नाव समोर आले. योगेशनेही या कृत्याची कबुली दिली. त्यानुसार प्रभूविरोधात सायबर पोलिसांनी सप्टेंबर २००९मध्ये आरोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी यावर्षी ३ जून रोजी पूर्ण झाली. तर, शुक्रवारी न्यायालयाने निकालवाचन पूर्ण करून प्रभूला शिक्षा ठोठावली.
--------------------------
एखाद्या महिलेला अश्लील मजकूर, छायाचित्र पाठविण्याच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा झाल्याने जनतेत, स्त्रियांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तसेच असे गुन्हे करणार्‍यांना नक्कीच वचक बसेल.
- धनंजय कुलकर्णी, पोलीस उपआयुक्त, मुंबई गुन्हे शाखा

Web Title: Three months imprisonment for sending obscene messages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.