शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरमधील उरी येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्थान, शस्त्रास्त्र जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 08:39 IST

रविवारी सकाळी जम्मू काश्मिरमधील उरी येथे झालेल्या चकमकीत लष्कराला तीन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे.

ठळक मुद्दे रविवारी सकाळी जम्मू काश्मिरमधील उरी येथे सुरू असलेल्या चकमकीत लष्कराला तीन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे लष्कराने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरलं होतं तसंच दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू होता.

श्रीनगर- रविवारी सकाळी जम्मू काश्मिरमधील उरी येथे झालेल्या चकमकीत लष्कराला तीन दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे लष्कराने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरलं होतं तसंच दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू होता. लष्कराने संपूर्ण परिसराची नाकाबंदीही केली होती. रविवारी रात्री उशिरा तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लष्कराने या तीन दहशतवाद्यांकडून 2 एके 47 रायफल, एक एके युबीजीएल, काही ग्रेनेड्स, पेट्रोल बॉम्ब, 2 आयईडीएस आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. रविवारी सकाळी चकमक सुरू झाल्यावर स्थानिक नागरिकांना चकमक सुरू असलेल्या ठिकाणापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.  

जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद यांनी काश्मीरमध्ये लष्कर आणि पोलिसांकडून सुरू असलेले ऑपरेशन ऑल आऊट बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचं सांगितलं. तसेच काश्मीर खोऱ्यातील विशेषत: दक्षिण काश्मिरमधील परिस्थिती लवकरच सामान्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. दहशतवादाच्या मार्गाने जाऊन हातात हत्यार घेणाऱ्या काश्मिरी तरुणांनी दहशतवादाचा रस्ता सोडावा, असं आवाहन त्यांनी केलं.  

दरम्यान,  पाकिस्तानी सैन्याने जम्मू, सांबा आणि पूंछ जिल्ह्यात भारतीय सीमांवरील चौक्या, तसंच नागरी वस्त्यांवर शनिवारी रात्रभर गोळीबार केला. यात बीएसएफचे दोन जवान आणि पाच गावकरी जखमी झाले. सीमावर्ती भागातील २० गावांना पाकिस्तानने लक्ष्य केल्याने, या भागातील शेकडो लोकांना घर सोडून जावं लागत आहे. गत काही दिवसांत अरणिया आणि आरएस पुरा या भागातील २० हजार लोकांनी गाव सोडलं आहे.

अधिका-यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने अरणिया, आरएस पुरा आणि रामगढ सेक्टरमध्ये शुक्रवारी सायंकाळपासून गोळीबार सुरूके ला. गोळीबारात आरएस पुरा सेक्टरच्या सतोवाली गावात तीन लोक जखमी झाले. अरणिया सेक्टरमध्ये एक जण जखमी झाला. सांबाच्या रामगढ सेक्टरमध्ये बीएसएफचे दोन जवान जखमी झाले. पूंछ भागात पाकच्या गोळीबारात ८ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. पोलिसांनी ५०० हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्यांना शिबिरात ठेवले आहे.

पाकिस्तानने १३ ते १८ सप्टेंबर सातत्याने गोळीबार केला. दोन दिवसांनंतर, २१ तारखेपासून गोळीबार सुरू झाला आहे. त्यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला, तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. या वर्षी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या २८५ घटना घडल्या आहेत. ही संख्या २०१६ मध्ये २२८ होती. सीमेवर सतत होणा-या गोळीबारामुळे अनिता कुमार यांच्यासारखी अनेक कुटुंबे भीतीच्या छायेत जगत आहेत. त्यांना गुरुवारी रात्री घरात पलंगाखाली लपून राहावे लागले. या गोळीबाराला त्रासून घर सोडण्याचा निर्णय त्यांनी शुक्रवारी घेतला

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू काश्मिरIndian Armyभारतीय जवान