तीन दहशतवाद्यांचा काश्मिरात खात्मा
By Admin | Updated: June 7, 2015 14:34 IST2015-06-07T01:24:51+5:302015-06-07T14:34:46+5:30
लष्कराने शनिवारी कूपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडताना तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

तीन दहशतवाद्यांचा काश्मिरात खात्मा
श्रीनगर : लष्कराने शनिवारी कूपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडताना तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
कूपवाडा जिल्ह्यात मागील पंधरवड्यात घुसखोरीची ही तिसरी घटना आहे. लष्कराच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सतर्क जवानांना पहाटे तूतमार गल्ली भागात नियंत्रण रेषेवर संशयास्पद हालचाली आढळून आल्या. दहशतवाद्यांनी नियंत्रणरेषा ओलांडून भारतीय हद्दीत पाऊल टाकताच जवानांनी त्यांना आव्हान दिले.
यावेळी तीन दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांनी २५ मे रोजी तंगधारमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता; परंतु लष्कराने तो हाणून पाडला. या घटनेत तीन जवान शहीद, तर दोन दहशतवादी ठार झाले होते. (वृत्तसंस्था)
या आठवड्याच्या प्रारंभी घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न झाला. यात चार दहशतवादी आणि एक नागरिक मृत्युमुखी पडला. (वृत्तसंस्था)