जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ३ दहशतवादी ठार

By Admin | Updated: May 7, 2016 08:20 IST2016-05-07T08:20:32+5:302016-05-07T08:20:32+5:30

जम्मू-काश्मीरच्या पुलवा जिल्ह्यातील अंवन्तीपुरा परिसरात दहशतवादी व सुरक्षा जवानांदरम्यान सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे.

Three militants killed in Jammu and Kashmir encounter | जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ३ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत ३ दहशतवादी ठार

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. २१ - जम्मू-काश्मीरच्या पुलवा जिल्ह्यातील अंवन्तीपुरा परिसरात दहशतवादी व सुरक्षा जवानांदरम्यान सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. या तिनही दहशतवाद्यांकडून जवानांनी एके- ४७ आणि आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. अजुनही या भागात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लष्कराची शोधमोहीम सुरु आहे.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री अंवन्तीपुरा परिसरात काही दहशतवादी लपल्याची खबर मिळताच सुरक्षा जवानांनी शोधमोहिम सुरू केली असता दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. जवानांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर देताना तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. 
यमसदनी पाठवलेल्या दहशतवाद्यांची नावे इशफाक बाबा, इशफाक दर आणि हसीब पॉल अशी आहेत. 

 

Web Title: Three militants killed in Jammu and Kashmir encounter