काश्मीरमध्ये चकमकीत ३ अतिरेकी ठार, १ जवान शहीद
By Admin | Updated: November 27, 2014 15:08 IST2014-11-27T14:51:58+5:302014-11-27T15:08:24+5:30
जम्मू- काश्मीरमधील अरनिया भागातील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका जवानासह तीन नागरिक ठार झाले आहेत. दरम्यान तीन दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले आहे.

काश्मीरमध्ये चकमकीत ३ अतिरेकी ठार, १ जवान शहीद
ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २७ - जम्मू- काश्मीरमधील अरनिया भागातील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका जवानासह तीन नागरिक ठार झाले आहेत. दरम्यान तीन दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले आहे. दहशतवादी व सुरक्षा पथकातील जवान यांच्यात अद्याप चकमक सुरू असून अरनिया येथे अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.
लष्कराच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री तीन ते चार दहशतवाद्यांनी शस्त्रास्त्रांच्या मोठ्या साठ्यासह लष्कराच्या बंकरसह घुसखोरी करत गोळीबार सुरू केला. लष्कराच्या जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र या दरम्यान एक जवान शहीद झाला असून तीन नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान लष्कराच्या जवानांनी तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे.