शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

भाटपारा हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी भाजपाकडून त्रिसदस्यीय समिती गठीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 09:04 IST

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान 2109 हिंसक घटनांची नोंद झाली आहे. टीएमसी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढतच चालला असून हिंसा भडकविण्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर केला जात आहे.

भाटपारा - पश्चिम बंगालमधील भाटपारा शहरातील परिस्थिती अजूनही तणापूर्ण आहे. भाजपाकडून भाटपारा हिंसाचारानिमित्त मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाटपारा हिंसाचाराविरोधात चौकशीसाठी भाजपाची समिती स्थापन केली आहे. ही समिती शनिवारी भाटपारा येथे भेट देऊन घडलेल्या घटनेचा निषेध करतील तसेच ही समिती भाटपाडा येथील घटनास्थळाची पाहणी करुन आपला अहवाल अमित शाह यांच्याकडे सादर करतील.

पश्चिम बंगाल येथील भाटपाडा येथे गुरूवारी झालेल्या हिंसाचारा दरम्यान पोलिसांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. भाजपा आणि टीएमसीच्या समर्थकांमध्ये वादावादी झाली होती. या हिंसाचाराविरोधात शुक्रवारी भाजपाने विरोध प्रदर्शने केली. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.  परिसरातील तणावाची परिस्थिती पाहता पोलिसांकडून त्याठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं होतं. त्यानंतरही भाजपाच्या समर्थकांनी मोर्चा काढला. 

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान 2109 हिंसक घटनांची नोंद झाली आहे. टीएमसी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढतच चालला असून हिंसा भडकविण्याचा आरोप दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर केला जात आहे. भाटपारा हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 16 जणांना अटक केली आहे. 

भाटपारामधील कायदा-सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती लक्षात घेता तिथे नवीन पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले होते. त्याचे पोलीस महासंचालक वीरेंद्रकुमार यांच्या हस्ते सोमवारी सकाळी उद्घाटन होणार होते. त्याच्या काही तास आधी या परिसरात पुन्हा हिंसाचार उफाळला होता. भातपारामध्ये पोलिसांच्या गोळीबारात दोन जण मरण पावल्याचा भाजपाने केलेला आरोप पोलिसांनी फेटाळून लावला आहे. जमावाला पांगविण्यासाठी फक्त अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, भातपारातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आमच्या पक्षाचे एक शिष्टमंडळ तिथे जाणार आहे.

प. बंगालमधील एकेकाळच्या हिंसाचारग्रस्त जंगलमहल, दार्जिलिंगसारखी सध्या भातपाराची अवस्था झाली आहे. भातपारामध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प. बंगालचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव व अन्य ज्येष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्यात आली. भातपारामध्ये १९ मे रोजी विधानसभेची पोटनिवडणुक घेण्यात आली. तेव्हापासून या परिसरात तृणमूल काँग्रेस व भाजपत सातत्याने हिंसक संघर्ष होत आहे. गावठी बॉम्ब हल्ला प्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालtmcठाणे महापालिकाBJPभाजपा