सोलापूरमध्ये महिलेसह चौघांना लुटले नरखेड शिवारात तीन लाख ७५ हजार चोरले
By Admin | Updated: May 8, 2014 20:53 IST2014-05-08T20:53:49+5:302014-05-08T20:53:49+5:30
मोहोळ (जि़ सोलापूर) : मित्राच्या आजारी आईला पाहायला आलेल्या महिलेसह चौघांना दिवसाढवळ्या लुटल्याची घटना नरखेड शिवारात बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली. या लुटमारीत तीन लाख ७५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

सोलापूरमध्ये महिलेसह चौघांना लुटले नरखेड शिवारात तीन लाख ७५ हजार चोरले
म होळ (जि़ सोलापूर) : मित्राच्या आजारी आईला पाहायला आलेल्या महिलेसह चौघांना दिवसाढवळ्या लुटल्याची घटना नरखेड शिवारात बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली. या लुटमारीत तीन लाख ७५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.मीरा व्यंकटेश प्रभू हे सहकारी गोविंद पाटील यांच्यासह कर्नाटकमधील सेडम येथे निघाले होते. मोहोळ आल्यानंतर गाडीचा चालक आमरे याच्या मित्राला भेटण्यासाठी नरखेडला जात असताना वाटेत थांबले असता अचानक आठ ते दहा चोरट्यांनी हल्ला केला. जबर मारहाण केल्यानंतर मीरा प्रभू यांच्या हातातील बांगड्या, कानातील फुले, रोख रक्कम असा तीन लाख ७५ हजारांचा ऐवज लुटून नेला. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात मीरा प्रभू यांनी दरोड्याची फिर्याद दाखल केली आहे. (प्रतिनिधी)