शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पावणेतीन लाख प्रतिज्ञापत्रे सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 06:49 IST

Shiv Sena: शिवसेना पक्षावरील हक्क कायम राखण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने आज पावणेतीन लाख पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली.

नवी दिल्ली : शिवसेना पक्षावरील हक्क कायम राखण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने आज पावणेतीन लाख पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केली.गेल्या १५ नोव्हेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाने ‘खरी शिवसेना कुणाची’ यासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाने अतिरिक्त कागदपत्रे २३ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश ठाकरे व शिंदे गटाला दिले आहेत. यानुसार आज ठाकरे गटाने शिवसेनेच्या राज्यभरातील व तसेच विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे सादर केली. या प्रतिज्ञापत्रांची संख्या २ लाख ८० हजार एवढी आहे. शिवसेनेचे नेते, उपनेते, जिल्हा प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, उपशहरप्रमुख, तालुका प्रमुखांसह विविध राज्यांच्या शाखांच्या पदाधिकाऱ्यांच्याही प्रतिज्ञापत्रांचा यात समावेश आहे.ट्रक भरून प्रतिज्ञापत्रेया प्रतिज्ञापत्रांचे गठ्ठे भरून एक ट्रक निवडणूक आयोगात गेला. या गठ्ठ्यांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची छायाचित्रेसुद्धा लावण्यात आलेली होती.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग