दुचाकींच्या अपघातात तीन ठार; दोन जखमी संवत्सर येथील घटना: मृत कन्नड-निफाडचे

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30

कोपरगाव(जि. अहमदनगर): भरधाव वेगाने जाणार्‍या दोन दुचाकींची समोरा-समोर धडक झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर दोन जण जखमी झाले. हा अपघात नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गावर कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता झाला़

Three killed in road accidents; The incident occurred in two injured Sanghsar: Dead Kannada-Niphadche | दुचाकींच्या अपघातात तीन ठार; दोन जखमी संवत्सर येथील घटना: मृत कन्नड-निफाडचे

दुचाकींच्या अपघातात तीन ठार; दोन जखमी संवत्सर येथील घटना: मृत कन्नड-निफाडचे

परगाव(जि. अहमदनगर): भरधाव वेगाने जाणार्‍या दोन दुचाकींची समोरा-समोर धडक झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर दोन जण जखमी झाले. हा अपघात नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गावर कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता झाला़
ज्ञानेश्वर रघुनाथ पारधे (वय ४५), कारभारी रावसाहेब शिंदे (वय ५०, दोघे रा़ जेऊर, ता़ कन्नड, जि़ औरंगाबाद) व राजेंद्र गणपतराव जगताप (वय ३०, रा़ तारूखेडले, ता़ निफाड, जि़ नाशिक) यांचा मृतांमध्ये समावेश आहे़ तर माया राजेंद्र जगताप (वय ३०) व रेणुका नवनाथ कदम (वय १५, रा़ सुरेगाव, ता़ कोपरगाव) या दोघी जखमी झाल्या़ जखमींना शिर्डी येथील साईनाथ रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे़ घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जेऊर येथील ज्ञानेश्वर रघुनाथ पारधे व कारभारी रावसाहेब शिंदे यांच्यासोबत एम.एच. २०, एल.पी. २२७६ क्रमांकाच्या स्प्लेंडर गाडीवरून वैजापूरहून कोपरगावच्या दिशेने येत होते़ त्याचवेळी तारूखेडले येथील राजेंद्र जगताप हे पत्नी माया जगताप व भाची रेणुका कदम हिला घेऊन श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे नातलगाच्या वर्षश्राद्धासाठी कोपरगावहून वैजापूरच्या दिशेने जात होते़ दोघांच्याही दुचाकी भरधाव वेगाने नागपूर-मुंबई हायवेने कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात असताना गणपती मंदिराजवळ ज्ञानेश्वर जगताप यांच्या वस्तीजवळ समोरासमोर धडकल्या़ दोन्ही दुचाकींचे हँडल एकमेकात गुंतल्या गेले़ त्यामुळे ज्ञानेश्वर पारधे, कारभारी शिंदे व राजेंद्र जगताप हे जागीच ठार झाले तर माया जगताप व रेणुका नवनाथ कदम या दोघी जखमी झाल्या़ सायंकाळी उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याची प्रकिया सुरू होती. (प्रतिनिधी)
....

Web Title: Three killed in road accidents; The incident occurred in two injured Sanghsar: Dead Kannada-Niphadche

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.