हत्तीच्या हल्ल्यात तीन ठार
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:25+5:302015-02-06T22:35:25+5:30
जलपाईगुडी : पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ातील कथांबरी येथे शुक्रवारी हत्तींनी केलेल्या हल्ल्यात तीन जण मारले गेले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. काही लोक गावाजवळच्या जंगलात गेले असताना त्यांचा हत्तीच्या कळपाशी सामना झाला. यावेळी लोकांना पाहून हत्ती चवताळले आणि त्यांनी या लोकांवर हल्ला केला. यात तीन जण जागीच ठार झाले. (वृत्तसंस्था)

हत्तीच्या हल्ल्यात तीन ठार
ज पाईगुडी : पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यातील कथांबरी येथे शुक्रवारी हत्तींनी केलेल्या हल्ल्यात तीन जण मारले गेले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. काही लोक गावाजवळच्या जंगलात गेले असताना त्यांचा हत्तीच्या कळपाशी सामना झाला. यावेळी लोकांना पाहून हत्ती चवताळले आणि त्यांनी या लोकांवर हल्ला केला. यात तीन जण जागीच ठार झाले. (वृत्तसंस्था)