जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ल्यात 3 जवान शहीद, 2 दहशतवादी ठार
By Admin | Updated: April 27, 2017 09:54 IST2017-04-27T07:51:31+5:302017-04-27T09:54:05+5:30
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. पंझगाम येथे पहाटेच्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्कर तळावर हल्ला केला

जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ल्यात 3 जवान शहीद, 2 दहशतवादी ठार
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 27 - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. पंझगाम येथे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्कर कॅम्पवर हल्ला केला. लष्कराने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं असून दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. मात्र दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एक मेजर, एक जेसीओ आणि एका जवानाचा समावेश आहे. कॅप्टन आयुष असं शहीद झालेल्या अधिका-याचं नाव आहे. पाच जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी श्रीनगरमधील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद या हल्ल्यामागे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेजवळ असलेल्या लष्करी कॅम्पमध्ये आत्मघाती स्फोट घडवण्याच्या हेतूने घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र लष्कराने त्यांचा डाव उधळत चोख प्रत्युत्तर दिलं. लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केलं आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. अजूनही काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता असून सर्च ऑपरेशन सुरु आहे.
#UPDATE: Three Army personnel lost their lives in #Kupwara attack; 2 terrorists killed. Search operation on pic.twitter.com/cEZ7q3gIum
— ANI (@ANI_news) April 27, 2017