काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद
By Admin | Updated: February 23, 2017 08:29 IST2017-02-23T08:14:10+5:302017-02-23T08:29:33+5:30
जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यामध्ये दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या जवानांवर हल्ला केला.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 23 - जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यामध्ये दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या जवानांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जवान शहीद झाले असून, 4 जवान जखमी आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.
या गोळीबारात एक महिलादेखील ठार झाली. तीन आठवडयातील अशा प्रकारचा हा चौथा हल्ला आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी या भागात सैन्याकडून शोध मोहिम सुरु झाली आहे.