शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

तीन फुटी दहशतवाद्याचा काश्मीरमध्ये शोध सुरू, अनेक हल्ल्यांशी संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 1:45 AM

अवघ्या तीन फूट उंचीच्या एका दहशतवाद्याने काश्मीर खो-यातील सुरक्षा दलांचा त्रास वाढवला आहे. गेल्या काही काळापासून खो-यामध्ये जे हल्ले झाले आहे, त्यात या बुटक्या दहशतवाद्याचा हात असल्याचे आढळून आले आहे.

श्रीनगर : अवघ्या तीन फूट उंचीच्या एका दहशतवाद्याने काश्मीर खो-यातील सुरक्षा दलांचा त्रास वाढवला आहे. गेल्या काही काळापासून खो-यामध्ये जे हल्ले झाले आहे, त्यात या बुटक्या दहशतवाद्याचा हात असल्याचे आढळून आले आहे. श्रीनगर विमानतळापाशी सीमा सुरक्षा दलाच्या असलेल्या कॅम्पवर झालेल्या हल्ल्याशीही त्याचा संबंध होता.तो अवघ्या तीन फुटांचा असल्यामुळे त्याला ओळखणे सोपे आहे, असे पोलीस सांगत असले तरीही तो त्यांना अद्याप सापडलेला नाही. त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.जैश-ए-मोहम्मद या संघटनेची दक्षिण काश्मीरमधील धुरा सांभाळणाºया या दहशतवाद्याचे नाव नूर मोहम्मद तंत्रे आहे. संसदेवर २00१ साली झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार गाजीबाबा याचा नूर मोहम्मद हा विश्वासातील साथीदार होता.तो त्रालमधून सूत्रे हाकत आहे. नूर मोहम्मदला २००३ साली दिल्लीत अटक झाली होती. तेव्हा त्याच्याकडून तब्बल १९ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. पुढे न्यायालयाने दहशतवादविरोधी कायद्याखाली दोषी ठरवून त्याला २०११ साली जन्मठेपेची शिक्षाही सुनावली. काही काळ तिहारच्या तर नंतर श्रीनगर येथील तुरुंगात काढल्यानंतर तो पॅरोलवर बाहेर आला आणि पुन्हा तुरुंगात परतलाच नाही.बाहेर आल्यानंतर त्याने जैश-ए-मोहम्मदसाठी काम सुरू केले. काश्मीरच्या दक्षिण भागांत ज्या कारवाया होत आहेत, त्यात नूर मोहम्मद व मुफ्ती वकार यांचा हात आहे. पुलवामा जिल्ह्यात आॅगस्टमध्ये पोलिसांवर जो हल्ला झाला, त्यातही नूर मोहम्मदचा हात होता, असा अंदाज आहे. त्या हल्ल्यामध्ये सुरक्षा दलाचे आठ जवान हुतात्मा झाले होते, तर तीन दहशतवादी ठार झाले होते. (वृत्तसंस्था)मंत्र्यावरही हल्लाश्रीनगर आंतरराष्ट्रीय विमातळाजवळ असलेल्या बीएसएफ कॅम्पवर ३ आॅक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यातही त्याचा हात होता. त्या वेळी तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. पण बीएसएफचा एक अधिकारीही शहीद झाला होता. जम्मू-काश्मीरचे सार्वजनिक बांधकाममंत्री नईम अख्तर यांच्यावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याशीही त्याचा संबंध होता.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू काश्मिर