शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
5
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
6
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
7
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
8
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
9
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
10
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
13
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
14
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
15
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
16
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
17
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
18
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
19
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
20
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?

तीन मजले, पाच कळस, दुप्पट आकार, जास्त उंची, तीन वर्षांत मंदिर तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 04:49 IST

तीन वर्षांत मंदिर तयार। वास्तुरचनाकार सोमपुरा

अयोध्या : अयोध्येतील बहुप्रतीक्षित राममंदिराचा आराखडा जवळपास निश्चित झाला असून, येथे उभारण्यात येणारे राममंदिर तब्बल तीन मजली असेल, गर्भगृहाच्या बरोबर माथ्यावर कळस असेल, मंदिराला पाच कळस असतील आणि मंदिराची उंचीही पूर्वीच्या तुलनेत बरीच जास्त असेल, अशी माहिती मंदिराचे वास्तुरचनाकार चंद्रकांत सोमपुरा यांनी दिली.

चंद्रकांत सोमपुरा मूळचे अहमदाबाद येथील असून, मंदिरांच्या आराखड्यातले ते तज्ज्ञ मानले जातात. देशभरात आतापर्यंत त्यांनी दोनशेपेक्षाही जास्त मंदिरांचे आराखडे तयार केले आहेत. सोमपुरा यांच्या मते नागर शैलीतरील हे मंदिर पूर्णपणे तयार होण्यास साधारण तीन ते साडेतीन वर्षे लागतील; जे पूर्णत: वास्तुशास्त्रानुसार असेल. मंदिराच्या जुन्या आराखड्यानुसार ते दोन मजली होणार होते, त्यात तीन मंडप आणि उंची १४१ फूट राहणार होती. मात्र, गेल्या वर्षीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मंदिराच्या आराखड्यात बदल करण्यात आला असून, आता ते तीन मजली असेल, कळसांची संख्या पाच असेल आणि उंचीही पूर्वीच्या तुलनेत बरीच जास्त असेल. पूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत नव्या मंदिराचा आकारही आता जवळपास दुप्पट असेल.सोमपुरा म्हणतात, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी तीस वर्षांपूर्वी राममंदिराचा आराखडा तयार करण्यास मला सांगितले होते; पण त्यावेळी हे काम अतिशय कठीण होते.१९९० मध्ये पहिल्यांदा मी अयोध्येला गेलो, त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव सोबत काहीही, अगदी मापाचा टेप न्यायलाही परवानगी नव्हती. त्यामुळे पावलांचा उपयोग करूनच त्यावेळी मी माप घेतले होते. १९९० मध्येच अयोध्येत दगडी कोरीव कामांसाठी एक युनिट स्थापन केले होते.ही आहेत देशातीलसात प्रमुख राममंदिरेभारतात रामाची काही अतिशय प्राचीन आणि सुंदर मंदिरे आहेत. अयोध्येत राममंदिराचे निर्माण सुरूहोत असताना या प्राचीन आणि श्रद्धाळूंसाठी अतिशय मानाचे स्थानअसणाऱ्या मंदिरांची ही ओळख.त्यातील एक म्हणजे नाशिकचेकाळाराममंदिर. जिथेभाविक देशभरातूननियमित येत असतात.रामस्वामी मंदिर, तामिळनाडूकुंभकोणम येथील हे रामाचे मंदिर. देखणं. प्रसन्न आहे.राम मंदिर, ओडिसाभुवनेश्वरच्या नानागेट चौकात हे राम मंदिर आहे. स्थानिकांची येथे दर्शनाला मोठी गर्दी असते.रघुनाथ मंदिर, जम्मूजम्मूच्या पक्की ढाकी या भागात हे रघुनाथमंदिर आहे. डोग्रा राजवटीत महाराज गुलाब सिंग यांनी1835मध्ये हे मंदिर बांधल्याची नोंद आहे.रामचौरा मंदिर, बिहारबिहारमधील हाजीपूरमधील रामचुरा मंदिरही अतिशय प्रसिद्ध आहे.श्री रामराजा मंदिर, ओरछामध्य प्रदेशात ओरछा येथे, झाशी- टिकमगढ मार्गावर हे मंदिर आहे. जे ओरछा मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. रामाच्या भारतातील सर्वाधिक पुरातन मंदिरांत या मंदिराची नोंद आढळते.सीता रामचंद्रस्वामी मंदिर,भद्रचलमतेलंगणातील भद्रचलम गावातील हे सीता रामचंद्रस्वामी मंदिरही अतिशय प्रसिद्ध आहे. भद्र या रामाच्या नावावरूनच या गावाचे नाव भद्रचलम आहे, असे म्हणतात.कोदंडराममंदिर,आंध्र प्रदेशआंध्र प्रदेशातील वोन्टीमिट्टा गावी हे कोदंडराम मंदिर आहे. स्थानिक भाषेत हे मंदिर ज्यांनी बांधले त्याविषयी अनेक आख्यायिका आहेत.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या