लखनऊ- उत्तर प्रदेशमधल्या गुन्हेगारांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिल्लीतच्या ग्रेटर नोएडातही या गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. बाईकस्वार असलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भाजपा नेत्याच्या कारवर अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात त्या भाजपा नेत्यासमवेत तिघांचा मृत्यू झाला आहे.भाजपा नेत्यासह दोन सुरक्षा रक्षकांचाही हत्या करण्यात आली आहे. ग्रेटर नोएडात दिवसाढवळ्या गुन्हेगारांनी हा हल्ला केला असून, आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक भाजपा नेते शिवकुमार स्वतःच्या सुरक्षारक्षकांसमवेत जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या गुन्हेगारांनी भाजपा नेत्याच्या फॉर्च्युनर कारवर अंदाधुंद गोळीबार केला आहे.भाजपा नेत्यासह त्या तिघांनाही गोळ्या लागल्या आहेत. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या शिवकुमार व त्याच्या दोन सुरक्षारक्षकांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
ग्रेटर नोएडात कारवर अज्ञातांचा अंदाधुंद गोळीबार, भाजपा नेत्यासमवेत 3 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 18:08 IST