शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

थरकाप उडवणारा व्हिडीओ! पॅरासेलिंगदरम्यान पॅराशूट टर्न घेताच ३ जण खाली कोसळले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 15:36 IST

Three Fall from Mid-air After Parachute Takes Turn :या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पॅरोशूटची दोरी एका बाजूने निसटली, त्यामुळे नियंत्रण गमावल्याने तिघे खाली पडले.

पॅरासेलिंग करणं जसं साहसी दिसते, त्यासोबत तसं जीवघेणा धोकाही ठरू शकतो. दमणमध्ये अशीच एक भयानक घटना घडली असून पॅरासेलिंग करताना हवेतून खाली पडून तीन जण जखमी झाले आहेत. 

या थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत असून टेकऑफनंतर लगेचच तीन लोक खाली पडताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. पॅरासेलिंग करीत असताना तीन पर्यटक तब्बल १०० फुटांवरून खाली पडले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तीन पर्यटक पॅराशूटवरुन टेक ऑफ केल्याच्या काही सेकंदात जमिनीवर कोसळतात. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पॅरोशूटची दोरी एका बाजूने निसटली, त्यामुळे नियंत्रण गमावल्याने तिघे खाली पडले.

साधारण ३० सेकंदाच्या या व्हिडीओत पर्यटक या एडव्हेंचरसाठी उत्साही होते. तिघेही पॅराशूटसह वर उडताना दिसत आहेत. पॅराशूट हवेत वळण घेतल्यानंतर तिघे जमिनीवर पडत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अशी घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये, दीवमध्ये अशीच एक घटना घडली होती, जिथे पॅरासेलिंग करताना दोरी तुटल्याने एक जोडपे समुद्रात पडले होते. दीव येथे सुट्टीवर गेलेल्या गुजराती दाम्पत्याला सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही. त्यांनी लाइफ जॅकेट घातले होते आणि समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांनी त्यांची त्वरीत सुटका केली.

 

टॅग्स :GujaratगुजरातPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल