सेल्फी भोवली, ट्रेनच्या धडकेत तिघांचा मृत्यू

By Admin | Updated: January 27, 2015 14:09 IST2015-01-27T14:07:33+5:302015-01-27T14:09:00+5:30

रेल्वे रुळावर सेल्फी काढण्याचा मोह मुथरा येथील तिघा तरुणांच्या जीवावर बेतला. रेल्वे रुळावर उभे राहून फोटो काढताना मागून येणा-या एक्सप्रेसखाली सापडून तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Three dead in the train, the self-styled Bhawali | सेल्फी भोवली, ट्रेनच्या धडकेत तिघांचा मृत्यू

सेल्फी भोवली, ट्रेनच्या धडकेत तिघांचा मृत्यू

ऑनलाइन लोकमत 

मथुरा, दि. २७ - रेल्वे रुळावर सेल्फी काढण्याचा मोह मुथरा येथील तिघा तरुणांच्या जीवावर बेतला. रेल्वे रुळावर उभे राहून फोटो काढताना मागून येणा-या एक्सप्रेसखाली सापडून तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या अपघातात एक तरुण बचावला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीनिमित्त दिल्लीत राहणारा अफजल त्याचे मित्र याकूब, इक्बाल आणि अनीश यांच्यासोबत एका गाडीतून आग्रा येथील ताजमहालला निघाला होता. आग्रा येथे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर नवीपूर येथे त्यांना रेल्वे मार्ग लागला. या रेल्वे मार्गावर फोटो काढून ते सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकायचे असा बेत त्यांनी आखला. रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून ते चौघेही रेल्वे मार्गावर गेले. अफजल, इक्बाल आणि याकूब हे तिघेही सेल्फी काढण्यात रमले असताना मागून भरधाव वेगात एक ट्रेन आली व ते तिघेही ट्रेनखाली सापडले. या तिघांचे छायाचित्र काढणारा अनिश हादेखील या अपघातात जखमी झाला असून अपघातानंतर तो बेशुद्ध झाला आहे. अनिशच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर पोलिस त्याची चौकशी करणार असून यानंतरच नेमके काय घडले हे समजू शकेल असे पोलिस अधिका-याने सांगितले. 

Web Title: Three dead in the train, the self-styled Bhawali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.