फटाके चोरीतील तिघे गजाअड

By Admin | Updated: November 15, 2015 23:14 IST2015-11-15T23:14:37+5:302015-11-15T23:14:37+5:30

अकोला - आकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या १ लाख २५ हजार रुपयांच्या चोरीप्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. या तीनही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Three crackers have been stolen | फटाके चोरीतील तिघे गजाअड

फटाके चोरीतील तिघे गजाअड

ोला - आकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या १ लाख २५ हजार रुपयांच्या चोरीप्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. या तीनही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आकोट फ ैलमध्ये शनिवारी १ लाख २५ हजार रुपयांचे फटाके व इतर मुद्देमाल चोरी गेला होता. या प्रकरणी आकोट फैल पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. रविवारी या चोरीप्रकरणातील तीन आरोपींना आकोट फैल पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये आकोट फैलमधील सलामनगर येथील रहिवासी अमजद खान उस्मान खान, अब्दुल अजीज अब्दुल सईद व शेख जहीर शेख करीम या तीन आरोपींचा समावेश आहे. त्यांच्याकडून काही मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

Web Title: Three crackers have been stolen