कळमन्यातील तीन मुले बेपत्ता
By Admin | Updated: December 27, 2014 18:55 IST2014-12-27T18:55:03+5:302014-12-27T18:55:03+5:30
नागपूर : कामावर जातो म्हणून सांगून घरून निघून गेलेली कळमन्यातील तीन मुले बेपत्ता झाली. या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

कळमन्यातील तीन मुले बेपत्ता
न गपूर : कामावर जातो म्हणून सांगून घरून निघून गेलेली कळमन्यातील तीन मुले बेपत्ता झाली. या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. गुलशननगर कळमना येथील देवकी रामचरण खतेले (वय ४५) यांचा मुलगा आकाश (वय १५) हा गणेश निखार तसेच कुलदीप नखाते नामक मित्रांसोबत गुरुवारी सकाळी घरून निघाला. खसाळा, जरीपटका येथील विटाभट्टीवरून येतो, असे सांगून हे तिघे गेले. मात्र ते घरी परतलेच नाही. सर्वत्र शोधाशोध करूनही ते सापडले नाही. त्यामुळे खतेले यांनी जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. तीनही मुले अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.---