गांधीसागरमध्ये तिघांचे मृतदेह
By Admin | Updated: January 30, 2015 00:54 IST2015-01-30T00:54:07+5:302015-01-30T00:54:07+5:30

गांधीसागरमध्ये तिघांचे मृतदेह
>नागपूर : सलून व्यावसायिकासह तिघांचे मृतदेह गांधीसागर तलावात आढळले. संतोष गुणवंत बोरकर (वय ४५, रा. पाचपावली) या सलून व्यावसायिकाचा मृतदेह आज सकाळी ११.३० च्या सुमारास गांधीसागर तलावात आढळला. ते बुधवारपासून बेपत्ता होते. त्यांच्या खिशात ओळखपत्र आढळल्यामुळे त्यांची ओळख पटली. दुपारी १ च्या सुमारास अजय मनोहर ठाकरे (वय ४०, रा. रामाजीची वाडी, गणेशपेठ) यांचा मृतदेह तलावात आढळला. अजय ठाकरेची गणेशपेठ ठाण्याजवळ चहाची टपरी आहे. त्याचप्रमाणे आज सायंकाळी ५ च्या सुमारास प्रफुल्ल वानखेडे नामक तरुणाचाही मृतदेह तलावात आढळला.----