भाजपाच्या तीन आमदारांचा राजीनामा

By Admin | Updated: May 29, 2014 17:14 IST2014-05-29T16:04:02+5:302014-05-29T17:14:13+5:30

लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्याने राजस्थानमधील भाजपाच्या तीन आमदारांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Three BJP MLAs resign | भाजपाच्या तीन आमदारांचा राजीनामा

भाजपाच्या तीन आमदारांचा राजीनामा

>ऑनलाइन टीम 
जयपूर, दि. २९ - लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्याने राजस्थानमधील भाजपाच्या तीन आमदारांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 
भाजपाचे ओम बिडला, बहादूर सिंह कोली आणि संतोष अहलावत असे या तीन आमदारांची नावे असून  लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्याने आज राजस्थान विधानसभेचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल यांच्याकडे दिला. तर सांवर लाल जाट या आमदाराने लोकसभेत विजय मिळाल्यानंतरही अद्याप आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही . विधानसभेचा सदस्य असताना एखादी व्यक्ती लोकसभेची सदस्य झाल्यास त्या व्यक्तीला १४ दिवसात पहिल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो असा नियम आहे. या नियमानुसार आमदारांनी राजीनामा दिला आहे. ओम बिडला यांनी कोटा लोकसभा, बहादूर सिंह कोली भरतपूर लोकसभा तर संतोष अहलावत यांनी सूरजगढ लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला आहे. 

Web Title: Three BJP MLAs resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.