ईएसडीएस कंपनीला तीन पुरस्कार
By Admin | Updated: September 20, 2016 00:27 IST2016-09-19T23:58:24+5:302016-09-20T00:27:41+5:30
नाशिक : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्या सातपूरच्या ईएसडीएस कंपनीला विविध क्षेत्रांतील तीन मानाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

ईएसडीएस कंपनीला तीन पुरस्कार
नाशिक : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्या सातपूरच्या ईएसडीएस कंपनीला विविध क्षेत्रांतील तीन मानाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
एशिया पॅसिफिक एचआरएम कॉँग्रेसच्या वतीने २५ मोस्ट इनोव्हेटिव्ह एचआर टेक लिडर्सच्या शृंखलेत ईएसडीएनची निवड करण्यात आली असून, बंगळुरू येथे संस्थेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रेट प्लेस वर्क संस्थेच्या वतीने देशभरातील १४५ नामांकित कंपन्यांचा सर्व्हे करून देशभरातील उत्कृष्ट कंपनी म्हणून ईएसडीएसची निवड करण्यात आली आहे. त्याप्रमाणे क्लाउड पार्टनर ऑफ द इयर या मानाच्या पुरस्काराने ओरिसा येथे झालेल्या कार्यक्रमात ईएसडीएसला प्रसिद्ध अभिनेता बोमेन इराणी गौरविण्यात आले. (वा.प्र.)