पार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरणात तिघा दोषींना १० वर्षांचा कारावास

By Admin | Updated: December 11, 2015 20:03 IST2015-12-11T20:03:00+5:302015-12-11T20:03:00+5:30

कोलकत्यात पार्क स्ट्रीट येथे अॅग्लो इंडियन महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात शुक्रवारी सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना दोषी ठरवत १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

Three accused in Park Street rape case, 10 years imprisonment | पार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरणात तिघा दोषींना १० वर्षांचा कारावास

पार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरणात तिघा दोषींना १० वर्षांचा कारावास

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि. ११ - कोलकत्यात पार्क स्ट्रीट येथे अॅग्लो इंडियन महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात शुक्रवारी सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना दोषी ठरवत १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. इन कॅमेरा सुनावणी झालेल्या या खटल्यात न्यायाधीशांनी रुमान खान, नासेर खान आणि सुमित बजाज या तिघा दोषींना १० वर्षांच्या शिक्षेसह एक लाख रुपयाचा दंडही ठोठावला. 

५ फेब्रुवारी २०१२ च्या रात्री पीडित महिला पार्क स्ट्रीटवरील नाईट क्लबमधून बाहेर पडल्यानंतर तिघा आरोपींनी बंदुकीच्या धाकावर या महिलेला मारहाण करुन धावत्या गाडीमध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर या महिलेला रस्त्यावर फेकून पसार झाले होते. ही महिला घटस्फोटीत असून, तिला दोन मुले आहेत. 

Web Title: Three accused in Park Street rape case, 10 years imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.