फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह तिघांना अटक पोलिसांची कारवाई : फ्लॅट मालकाला दिली होती जिवे मारण्याची धमकी

By Admin | Updated: December 13, 2015 00:07 IST2015-12-13T00:07:37+5:302015-12-13T00:07:37+5:30

लातूर : शहरातील विशाल नगरात राहणार्‍या एका फ्लॅटमालकाचा बनावट कागदपत्रांच्या आधारे फ्लॅट बळकावून, त्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मे २०१५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमआयडीसी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना शनिवारी अटक केली. त्याच्याविरोधात कलम ४२० भादंविप्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Three accused arrested for cheating, police action: Flat owner had given threat to kill | फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह तिघांना अटक पोलिसांची कारवाई : फ्लॅट मालकाला दिली होती जिवे मारण्याची धमकी

फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह तिघांना अटक पोलिसांची कारवाई : फ्लॅट मालकाला दिली होती जिवे मारण्याची धमकी

तूर : शहरातील विशाल नगरात राहणार्‍या एका फ्लॅटमालकाचा बनावट कागदपत्रांच्या आधारे फ्लॅट बळकावून, त्यास जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मे २०१५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमआयडीसी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना शनिवारी अटक केली. त्याच्याविरोधात कलम ४२० भादंविप्रमाणे गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
लातूर शहरातील विशाल नगर भागात प्रथमेश आपर्टमेंटमध्ये चुन्नीलाल कारसनभाई पिटवा वय ५६ यांचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये जितेंद्र तुकाराम जाधव व शेख लतिका मैनोद्दिन यांनी रमेश काशिनाथ गायकवाड यांच्या मदतीने घुसखोरी करत प्रवेश केला. मुळमालक चुन्नीलाल कारसनभाई पिटवा यांनी हा फ्लॅट सुभाष धोंडिबा जंगापल्ले यांना रितसर विक्री केला. त्यानंतर त्यांनी आपल्या फ्लॅटचा ताबा देण्यासाठी ते फ्लॅटवर गेले, त्यावेळी तिघा आरोपींनी अश्लिल शिविगाळ करुन, जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी ३० मे २०१५ रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कलम ४५२, ३८५, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे प्रारंभी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी करण्यात आलेल्या तपासात या तिघांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी तिघा आरोपींनी बनावट कागदपत्रांच्याआधारे फ्लॅट बळकावला असल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने त्यांच्याविरोधात कलम ४२० प्रमाणे शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ लाखांची मागितली खंडणी....
चुन्नीलाल पिटवा यांना आरोपींनी जर आपला हा फ्लॅट हवा असेल, तर १२ लाख रुपये द्यावे अशी थेट मागणी केली होती. याप्रकरणी चुन्नीलाल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मे २०१५ मध्येच फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला असता, या तपासात एका महिलेसह तिघांना शनिवारी अटक करण्यात आली.

Web Title: Three accused arrested for cheating, police action: Flat owner had given threat to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.