शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

३ दिवसांत १३ विमाने उडविण्याच्या धमक्या; केंद्र सरकारकडून उपययोजना सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 09:11 IST

१५ ऑक्टोबर रोजी ७ विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्या आल्या होत्या. दिल्ली ते शिकागो या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचाही या उड्डाणांमध्ये समावेश होता. या विमानाला तातडीने कॅनडाकडे वळवून इकालुईट विमानतळावर उतरवण्यात आले होते. तपासात बॉम्बच्या धमक्या खोट्या असल्याचे समोर आले. 

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्या सतत मिळत आहेत. ३ दिवसांत अशा १३ विमानांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या आहेत. बुधवारीही धमकीमुळे इंडिगोच्या मुंबई-दिल्ली विमानाला उड्डाणानंतर तातडीने पुन्हा परत बोलवावे लागले तर आकासा एअरलाइन्सचे दिल्ली-बेंगळुरू विमान अहमदाबादला वळवण्यात आले. या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

१५ ऑक्टोबर रोजी ७ विमानांमध्ये बॉम्ब असल्याच्या धमक्या आल्या होत्या. दिल्ली ते शिकागो या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचाही या उड्डाणांमध्ये समावेश होता. या विमानाला तातडीने कॅनडाकडे वळवून इकालुईट विमानतळावर उतरवण्यात आले होते. तपासात बॉम्बच्या धमक्या खोट्या असल्याचे समोर आले. 

आरोपींवर कठोर कारवाईबुधवारी, विमान वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना धमकीचे संदेश पाठविण्याबाबत संसदीय समितीला उत्तर दिले. आरोपींची ओळख पटली असून कारवाई सुरू असल्याचे मंत्रालयाने सांगितले. तसेच अधिक माहिती गोळा करून अशा अनेक प्रकरणांवर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले.

एअर मार्शल दुप्पटयाप्रकरणी विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सततच्या धमक्यांमुळे, केंद्राने बुधवारी उड्डाणांवर एअर मार्शलची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. ते विमानात साध्या कपड्यातच राहतील.

कुणाला धमक्या?- आकासा एअरलाइन्सचे दिल्ली बेंगळुरू विमान- इंडिगोचे मुंबई दिल्ली विमान- जयपूर बेंगळुरू एअर इंडिया विमान- दरभंगा मुंबई स्पाईसजेट विमान- सिलीगुडी बेंगळुरू आकासा एअर- दिल्ली शिकागो एअर इंडिया- दम्मम लखनौ इंडिगो विमान- मदुरई सिंगापूर एअर इंडिया विमान- अमृतसर दिल्ली अलायन्स एअर - अयोध्या बेंगळुरू एअर इंडिया एक्सप्रेस- बागडोगरा बेंगळुरू आकासा एअर- मुंबई न्यूयॉर्क एअर इंडिया विमान- मस्कतला जाणारे इंडिगो विमान

टॅग्स :airplaneविमानGovernmentसरकार