वॉशिंग्टन/नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान यांच्यातील आण्विक संघर्ष आपण थांबवले, असा दावा करीत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी शस्त्रसंधीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. हा संघर्ष थांबवला तर अमेरिका मोठ्या प्रमाणात दोन्ही देशांशी व्यापार वाढवील, असे आपण दोन्ही देशांना सांगितल्याचे नमूद करून ट्रम्प यांनी एक प्रकारे व्यापाराचे आमिष दाखवल्यावर हा संघर्ष थांबल्याचे सांगत आपली टिमकी वाजवली.
प्रशासनाने शनिवारी भारत-पाकदरम्यानचा धोकादायक संघर्ष थांबवून एक ऐतिहासिक कामगिरी केली असल्याचेही ते म्हणाले. ट्रम्प म्हणाले, ‘भारत-पाकिस्तान अत्यंत आक्रमक मानसिकतेत होते. आम्ही व्यापाराच्या मुद्द्याआधारे या देशांतील संघर्ष मिटवण्यात मदत केली.